Entertainment News : या दिवसांत नेटफ्लिक्स पाहता येणार मोफत

एमपीसी न्यूज : लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सनेही नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. भारतात दोन दिवसांसाठी नेटफ्लिक्सने मोफत सबस्क्रिप्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोफत सेवा Netflix StreamFest अंतर्गत युझर्सनाही देण्यात येणार आहे.

कोणत्याही प्रकारचे प्रिमिअम कंटेट नेटफ्लिक्सच्या या फेस्टदरम्यान युझर्सना पाहता येणार आहे. तसेच त्यांना यासाठी पैसैही मोजावे लागणार नाहीत. पण युझर्सना यासाठी ईमेल आयडी अथवा मोबाईल क्रमांकाद्वारे साईन इन करावे लागणार आहे. ज्या कंटेटचा अॅक्सेस प्रिमिअम युझर्सना दिला जातो, तो सर्व कंटेट युझर्सना या दोन दिवसांत मोफत पाहता येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, आपल्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डाची माहितीही साईन अप केल्यानंतर द्यावी लागणार नाही.

Netflix StreamFest अंतर्गत मोफत कंटेट पाहण्यासाठी Netflix.com/StreamFest वर भेट देता येईल किंवा अॅप डाऊनलोड करूनही याचा लाभ घेता येईल. याव्यतिरिक्त Netflix.com/StreamFest जाऊन युझर्सना रिमांईडरही सेट करता येणार आहे. परंतु यासाठी कंपनीने एक अट घातली आहे. यादरम्यान मोफत सेवेचा लाभ घेणाऱ्या युझर्सना एचडी ऐवजी केवळ स्टँडर्ड डेफिनेशन कंटेंटच पाहायला मिळेल. तर दुसरीकडे नेटफ्लिक्स स्मार्टफोन, टीव्ही, गेमिंग कन्सोलमध्येही पाहता येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. याव्यतिरिक्त नेटफ्लिक्स टीव्हीलाही कास्ट करता येईल.

५ डिसेंबर रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते ६ डिसेंबर ११.५९ पर्यंत नेटफ्लिक्स मोफत पाहता येणार आहे. युझर्सची संख्या स्ट्रीम फेस्टदरम्यान मर्यादित केली जाणार आहे. जर यादरम्यान StreamFest is at capacity हा मेसेज तुम्हाला दिसला तर तुम्ही कधी नेटफ्लिक्स पाहू शकाल, हे तुम्हाला सांगितले जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.