Pune : सुप्रसिद्ध एसपीज् बिर्याणीला अभिनेता आमीर खान यांची भेट

एमपीसी न्यूज – पुण्याच्या खाद्यसंस्कृतीला खवैय्यांची कमी नाही तशी हॉटेलची कमी नाही. पुण्यातील प्रसिद्ध असलेली एसपीज् बिर्याणीला काल दि. ९ ऑगस्टला अभिनेता आमीर खान याने भेट दिली.

मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्यांनी एसपीज् बिर्याणीला आवर्जून भेट देतात. हॉटेलची चव एकदा का जिभेवर रेंगाळली तर पुणेकर ती चव कधीच सोडत नसतात. याचे उदाहरण म्हणजे पुण्यातील एसपीज् बिर्याणी. आतापर्यंत अनेक नामवंत कलाकारांनी एसपीज् बिर्याणीला भेट दिली. आता तर बॉलीवूड चित्रपटामधील अभिनेतेही एसपीज् चव चाखल्याशिवाय जात नाही. रोजची भाजी असो वा स्पेशल करी एसपीज् बिर्याणीची चवच न्यारी आहे.

पुणेकर खवय्यांना बिर्याणीचं भलतच वेड. मग ती व्हेज असो वा नॉनव्हेज. पुण्यातील बिर्याणी प्रेमींचा एक मस्त पॉंईंट आहे तो म्हणजे एसपीज् बिर्याणी. गेल्या काही वर्षांपासून हे खवय्यांच्या मनावर अधिराज्य करत आहे. शहराच्या कानाकोप-यांतून खवय्ये इथे बिर्याणी खायला आवर्जून येतात. चव अगदी स्वादिष्ट झणझणीत तसेच अस्सल बिर्याणीची असते. त्यासाठी एसपीज् बिर्याणीला आवर्जून भेट देतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.