Bhosari : वैष्णोदेवीचे मंदिर चोरट्याने फोडले, पादुका, मंगळसूत्र चोरीला

एमपीसी न्यूज – कुलूप लावून बंद असलेल्या वैष्णोदेवी मंदिराच्या खिडकीचे ग्रील उचकटून चोरट्यांनी मंदिरातील मातेच्या चांदीच्या पादुका, अर्धा तोळ्याचे मंगळसूत्र, चांदीचा हार असा 56 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना भोसरीतील इंद्रायणीनगर येथील वैष्णोदेवी मातेच्या मंदिरात गुरूवारी रात्री घडली.

प्रसन्न रूक्मिणीकांता पावसे (वय 37, रा. भगतवस्ती, हनुमाननगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पावसे हे इंद्रायणीनगर येथील वैष्णोदेवी मंदिरात पुजारी आहेत. पावसे यांनी गुरूवारी रात्री नऊ वाजता मंदिर कुलूप लावून बंद केले होते.

चोरटे मंदिराच्या खिडकीचे गज कापून आतमध्ये घुसले. वैष्णोदेवी मातेच्या 40 हजारांच्या चांदीच्या पादुका, 10 हजार रूपयांचे अर्धा तोळ्याचे मंगळसूत्र, 2 हजारांचे सोन्याचे चार मणी आणि चार हजारांचा चांदीचा हार असा 56 हजारांचा ऐवज चोरून नेला. शुक्रवारी सकाळी सात वाजता पावसे मंदिरात पूजा करण्यासाठी आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.