Pune Crime : त्या’ आयटी इंजिनियरचा खून केवळ तीन हजार रुपयांसाठी; 24 तासात आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज : शनिवारी वाघोलीतील मल्हारी डोंगराच्या पायथ्याशी एका आयटी इंजिनियर चा खून झाला होता. रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. (Pune Crime) मात्र अवघ्या 24 तासात पुणे पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केली आहे. अवघ्या तीन हजार रुपयांवरून वाद झाल्यानंतर आरोपीने गळात चिरून त्याचा खून केला.

गौरव सुरेश उरावी (वय 35, शिवाजीनगर अमरावती) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर टॅक्सी चालक भगवान केंद्रे (वय 23) याला अटक केली आहे. त्याचा आणखी एक साथीदार पसार झाला आहे. लोणीकंद पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : पोहण्यासाठी आलेला तरुण खडकवासला धरणाच्या कालव्यात बुडाला 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, वाघोलीतील मल्हारी डोंगराच्या पायथ्याशी शनिवारी दुपारी गौरवचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. घटनास्थळी दाखल झालेल्या लोणीकंद पोलिसांना गौरवची दुचाकी सापडली होती. दुचाकीवरून त्यांनी गौरवची ओळख पटवली आणि तपासाला सुरुवात केली. शुक्रवारी रात्री गौरव जेवायला जातो सांगून घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो परत आलाच नाही. शनिवारी दुपारी त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते.

लोणीकंद पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला असता आरोपी भगवान केंद्रे याने गौरव चा खून केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या एका पथकाने त्याला कळंब तालुक्यातील परतापुर येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने खून केल्याची कबुली दिली. आरोपी भगवान केंद्रे याच्याकडे फोर व्हीलर आहे. ॲप आधारित टॅक्सी सर्विस तो पुरवतो. यातूनच भगवान आणि गौरव यांची ओळख झाली होती. गौरवने त्याच्या टॅक्सीतून यापूर्वी प्रवासही केला होता. त्याचीच 3000 रुपये गौरव कडे होते. हे पैसे परत न दिल्यानेच भगवान आणि त्याच्या साथीदाराने गौरवचा खून केल्याचे निष्पन्न झाले. लोणीकंद पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.