Jayant Patil : “निवडक लोकांमुळे संपूर्ण पोलीस दल बदनाम”, अमोल कोल्हेंच्या त्या आरोपावरून जयंत पाटलांचा निशाणा

एमपीसी न्यूज : अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा प्रयोग सध्या पिंपरी-चिंचवड शहरात होत आहे. (Jayant Patil) मात्र शनिवारी होणाऱ्या एका प्रयोगादरम्यान अमोल कोल्हे यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांवर गंभीर आरोप केले. मोफत पास मिळावेत यासाठी पोलिसांनी धमकी दिल्याचं अमोल कोल्हे यांनी जाहीर कार्यक्रमातून सांगितलं. अमोल कोल्हे यांनी थेट पोलिसांवरच अशा प्रकारचे आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावरून आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 

Pune Crime : त्या’ आयटी इंजिनियरचा खून केवळ तीन हजार रुपयांसाठी; 24 तासात आरोपी अटकेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये जयंत पाटील म्हणत आहेत, “लोकसभेचे सदस्य व लोकप्रिय कलाकार असलेले डॉ. अमोल कोल्हे हे सध्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील महानाट्याचे प्रयोग राज्यभर करत आहेत. राज्यभर त्यांच्या प्रयोगांना उदंड प्रतिसाद मिळत असून छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवन व कार्याविषयी जनजागृती होत आहे. मात्र पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांनी या महानाट्याचे मोफत पास न मिळाल्यास नाटकाचे शो बंद पाडण्याची धमकी दिली आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, हे पोलीस दलाचे काम असून अशा काही निवडक लोकांच्या मुळे संपूर्ण पोलीस दल बदनाम होत आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी यात त्वरित लक्ष घालावे.”

 

 

 

Pune Crime : त्या’ आयटी इंजिनियरचा खून केवळ तीन हजार रुपयांसाठी; 24 तासात आरोपी अटकेत

अमोल कोल्हे यांच्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याला संपूर्ण राज्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्यभरात ठिकठिकाणी होणाऱ्या त्यांच्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांची ही मोठी गर्दी होत आहे. (Jayant Patil)  मात्र मोफत तिकीट मिळावेत यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून धमकी दिली जात असल्याचा त्यांच्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आता राज्याचे गृहमंत्री काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.