Nigadi : पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या वादातून सात जणांनी मिळून तरुणाला मारहाण करत लोखंडी कोयत्याने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 8) दुपारी साडेचारच्या सुमारास थरमॅक्स चौक आणि बर्ड व्हॅली चौकात घडली.

जयभीम भीका भालेराव (वय 25, रा. ताम्हाणे वस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अक्षय मुकुंद गायकवाड, लखन कैलास सातव, राहुल दत्तू महारनवर, गणेश दत्तू लकडे, अजय सोनवणे आणि अन्य दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयभीम आणि आरोपी यांच्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून अक्षय आणि राहुल यांनी बुधवारी जयभीम याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच त्यांच्या अन्य आरोपी मित्रांना जमवून जयभीमला मारहाण केली. अक्षय याने लोखंडी कोयत्याने जयभीमच्या डोक्यात वार केले. यामध्ये जयभीम हा गंभीर जखमी झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस याचा तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.