Nigdi : निगडी प्राधिकरण येथील चौकाला शांताराम भोंडवे यांचे नाव

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी मुख्य उद्यान अधीक्षक शांताराम भोंडवे यांच्या जन्मदिवसानिमित्त निगडी प्राधिकरण येथील पाटीदार भवन समोरील चौकाचे शांताराम भोंडवे चौक असे नामकरण करण्यात आले. या चौकाच्या नामफलकाचे आज, (मंगळवारी) अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला केंद्रीय राजमार्ग मंत्रालयाचे उपसचिव आणि शांताराम भोंडवे यांचे सुपुत्र संकेत भोंडवे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, लायन्स क्लब अध्यक्ष सुदाम भोरे, आशिया मानवशक्ती विकास संस्थेचे अध्यक्ष नागेश वसतकर, साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुले, पत्रकार अनिल कातळे, डॉ. अभिजित भोंडवे, अमोल भोंडवे, रोहित खर्गे, डॉ गुलाबराव लांडगे, भाऊसाहेब लांडगे, राहुल गावडे, जोपा पवार, भंडारा डोंगर समितीचे सचिव नितीन गवळी, वाल्हेकरवाडी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर, योगगुरू रमेश मांडवकर, मच्छिंद्र राणे पाटील, विशाल वाकडकर, श्रीमती सुमन भोंडवे, निलवंती राणे, उषा लांडगे, पूजा लांडगे, स्वाती पडवळ, हिरा सुप्रे आदी उपस्थित होते.

यावेळी भोंडवे कुटुंबियांकडून पवना नदीमधील जलपर्णी काढण्यासाठी 5001 रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी आपल्या मनोगतामधून दिवंगत शांताराम भोंडवे यांच्या आठवणी जागवल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.