BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पुण्यात आजपासून हेल्मेटसक्ती ; पुणेकरांचा संमिश्र प्रतिसाद

एमपीसी न्यूज- आजपासून पुणे शहरात दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली आहे. पुण्यातील वाहतूक समस्या तसेच गंभीर स्वरुपाच्या अपघातांची वाढती संख्या विचारात घेऊन पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी नोव्हेंबर महिन्यात शहरात हेल्मेटसक्तीचा निर्णय घेतला होता. नवीन वर्षांपासून हेल्मेटसक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार आजपासून हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली आहे. मात्र हेल्मेटसक्तीला पुणेकरांनी संमिश्र प्रतिसाद दिला आहे.

पुणेकरांसाठी हेल्मेटसक्ती हा विषय कायमच वादाचा ठरलेला आहे. हेल्मेटसक्तीचे आदेश असूनदेखील पुण्यातील वाहनाचालक हेल्मेटचा वापर करणे टाळतात. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. अनेकदा प्रबोधनही झाले आहे असे असून देखील हेल्मेटचा वापर वाहनचालकांकडून होत नाही. परंतू आजपासून मात्र पुण्यात हेल्मेटसक्तीची प्रभावीपणे अंमलबजावणी होणार आहे.

हेल्मेट न वापरल्यास प्रत्येकी 500 रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. तरीदेखील पुणेकर हेल्मेट वापरताना दिसत नाहीत. पुणेकरांना हेल्मेट वापरण्याची सवय लागावी यासाठी आता कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3