Pimpri: साडेचार लाख बालकांना गोवर-रुबेला प्रतिबंधक लस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे चार लाख 34 हजार 234 बालकांनी गोवर-रुबेला प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घेतला. या मोहिमेमध्ये सहा लाख 16 हजार 193 बालकांना लस देण्याचे उदिष्ट निश्चित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे 27 नोव्हेंबरपासून गोवर-रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहीम शहरामध्ये राबविण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील नऊ महिने ते पंधरा वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येत आहे. या लसीकरणासाठी महापालिका आणि खासगी शाळा, तसेच अंगणवाडी, बालवाडी आणि नर्सरीमध्ये 1200 ठिकाणी लसीकरण मोहीम सुरु आहे.

त्याअंतर्गत शहरातील चार लाख 34 हजार 234 बालकांना या गोवर-रुबेला प्रतिबंधक लस देण्यात आली. या लसीकरण मोहिमेसाठी सर्व वैद्यकीय अधिकारी, एएनएम, आरोग्य कर्मचारी, महापालिका व खासगी शाळेतील शिक्षक, तसेच स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले, असे वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.