Nigdi: निगडीमध्ये भागवत कथा सप्ताह

एमपीसी न्यूज – विश्वशांती सेवा समिती पुणे विभागातर्फे भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताह निगडी येथील भेळ चौक परिसरातील महापौर निवास मैदानावर 24 ते 31 डिसेंबर या दरम्यान दुपारी अडीच ते सायंकाळी साडे सहा या वेळेत होणार आहे.

या सप्ताहात पंडित देवकीनंदन ठाकूर महाराज मार्गदर्शन करणार आहेत. आज (सोमवारी)सप्ताहाला सुरुवात झाली आहे.  यावेळी व्यास नारद संवाद, मंगळवारी (दि.25)कपिल देवाहुती संवाद, बुधवारी (दि. 26) नृसिंह व वामन अवतार, गुरुवारी (दि. 27) जडभरत संवाद, शुक्रवारी(दि. 28)श्रीराम व कृष्णा जन्माष्टमी सोहळा, बाललीला गोवर्धन पूजा, शनिवारी (दि. 29) रुख्मिणी विवाह, रविवारी (दि. 30)सुदामा चरित्र या विषयावर निरूपण देणार आहेत. तसेच, सोमवारी (दि. 31) भजनामृत व भंडारा होईल, अशी माहिती अध्यक्ष जगदीशप्रसाद सिंघल यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.