Nigdi : ‘मधुमेह नियंत्रित करता येतो का’? या विषयावर रविवारी निगडीत व्याख्यान

रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे आयोजन

एमपीसी न्यूज- रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे ‘मधुमेह नियंत्रित करता येतो का’? या विषयावर डॉ. चंद्रकांत कणसे यांचे उद्या (रविवारी) मोफत व्याख्यान आयोजित केले आहे. याबाबतची माहिती रोटरीचे अध्यक्ष जिग्नेश आगरवाल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

निगडी, प्राधिकरण येथील एस.बी.पाटील इन्स्टि्टयूट ऑफ मॅनजमेंट येथे उद्या, रविवारी सकाळी साडेनऊ वाजता व्याख्यान होणार आहे. यावेळी रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

जिग्नेश आगरवाल म्हणाले, “मधुमेहाचा धोका वाढीस लागला असून अनेकजण मधुमेहाने त्रस्त आहेत. बदलती जीवनशैली, खाण्याच्या अपायकारक सवयी, चरबीयुक्त आहाराचे आणि तळलेल्या पदार्थाचे मोठ्या प्रमाणावर केले जाणारे सेवन, व्यायामाचा अभाव अशी विविध कारणांमुळे मधुमेहांच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे ‘मधुमेह नियंत्रित करता येतो का’? याबाबतच्या माहितीची आवश्यकता आहे. मधुमेह कसा नियंत्रणात आणायचा याची माहिती व्याख्यानात दिली जाणार आहे”

हे व्याख्यान सर्वांसाठी खुले असून पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी या व्याख्यानाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिग्नेश अगरवाल यांनी केले आहे. व्याख्यानाच्या संयोजनात रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण, पिंपरी, पिंपरी टाऊन, निगडी, वाल्हेकरवाडी, चिंचवड या क्लबने पुढाकार घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.