Nigdi: दुचाकी पार्किंग करण्यावरून वाद, दुचाकी चालकाला शिवीगाळ

एमपीसी न्यूज – दुचाकी पार्किंग करण्यावरून एका दुचाकीस्वाराचा त्रिकुटाने तोंडाला रूमाल बांधून पाठलाग केला. तसेच दुचाकी आडवी लावत शिवीगाळ केली. हा प्रकार गुरूवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास आकुर्डी येथे घडला.

याप्रकरणी संजय अंबादास मंदवाडे (वय 45, रा. पीसीएमसी कॉलेजजवळ, प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी मंदवडे गुरुवारी दुचाकीवरुन घरी जात होते. त्याचवेळी पार्किंगच्या कारणावरुन तिघांनी तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरुन त्यांचा पाठलाग केला. त्यांच्या दुचाकीला गाडी आडवी लावून त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला. शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.