-MPC-TOP-MOST-BANNER-I

Nigdi Crime News : Nigdi : प्राधिकरणात भरदिवसा घरफोडी, लाखाचा ऐवज लंपास

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – भरदिवसा चोरट्यांनी घरफोडी करून 72 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 14) सकाळी दहा ते दुपारी दोन वाजताच्या कालावधीत संजय काळे मैदानासमोर आकुर्डी -प्राधिकरण येथे घडली.

लता दीपक पडवळ (वय 37, रा. संजय काळे मैदानासमोर आकुर्डी प्राधिकरण) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पडवळ या सोमवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेल्या. कामावरून त्या दुपारी दोन वाजताच्या सुमारास घरी आल्या. दरम्यानच्या कालावधीत यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा कट करून चोरट्यांनी घरातील कपाटाच्या ड्राॅवरमधून 72 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

 

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn