Thergaon News : किवळे, विकासनगरमधील रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट

एमपीसीन्यूज : पूर्णानगर विकास कृती समितीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते विकास गर्ग यांच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील किवळे-विकासनगर भागातील कोरोना रुग्णांसाठी दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन स्व:खर्चातून उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. या दोन्ही मशीन शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते आज ( मंगळवारी) युवा सेनेचे कार्यकर्ते राजेंद्र तरस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.

खासदार बारणे यांच्या थेरगाव येथील जनसंपर्क कार्यालयात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन तरस यांच्या ताब्यात देण्यात आल्या. या वेळी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे युवा सेना अधिकारी विश्वजीत बारणे आणि मावळ युवा सेनेचे विशाल दांगट आदी उपस्थित होते.

प्राथमिक स्टेजला असलेल्या रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यता भासल्यास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा उपयोग करता येतो. नैसर्गिक हवेचे शुध्दीकरण करुन ऑक्सिजन रुग्णास पुरविण्यास याची मदत होते. यासाठी वेगळ्या ऑक्सिजन सिलेंडरची आवश्यता भासत नाही. त्यामुळे हे उपकरण घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फायदेशीर ठरत आहे.

सध्या कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज पाहता विकास गर्ग यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपकरण मोफत उपलब्ध केले आहे. या उपकरणांचा किवळे, विकासनगर परिसरात घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फायदा होणार आहे. गर्ग यांचे हे सेवाभावी कार्य कौतुकास्पद आहे. गर्ग आणि राजेंद्र तरस या दोन्ही तरुण कार्यकर्त्यांनी कोरोना आणि लॉकडाऊन कालावधीत गरजू नागरिकांसाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. श्रीरंग बारणे : खासदार, मावळ लोकसभा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.