Nigdi Crime News : हसल्याच्या कारणावरून दोघांवर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – हसल्याच्या कारणावरून दोघांवर (Nigdi Crime News) कोयत्याने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार शुक्रवारी (दि. 31) रात्री पावणे बारा आजता अजंठानगर, चिंचवड येथे घडला.

 

 

Breaking News : संजय राऊत यांना धमकी प्रकरणी एका तरुणाला पुण्यातून ताब्यात घेतले

 

 

ज्ञानेश्वर सोनवणे, सनी सोनवणे अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी संतोष आसाराम सोनवणे (वय 20, रा. अजंठानगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अंकुश शामराव कुऱ्हाडकर (वय 20), लव शामराव कुऱ्हाडकर (वय 18, रा. अजंठानगर, चिंचवड) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष आणि आरोपी अंकुश हे अजंठानगर येथे गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी मस्करीमध्ये फिर्यादी हसले. त्यावरून चिडलेल्या अंकुश याने फिर्यादीस मारहाण केली. तिथे फिर्यादी यांचे भाऊ ज्ञानेश्वर आणि सनी हे आले. अंकुश याने त्याचा भाऊ लव याला बोलावून आणत फिर्यादीचे भाऊ ज्ञानेश्वर आणि सनी यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस (Nigdi Crime News) तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.