Nigdi : श्रावणबाळ होण्यासाठी प्रत्येकाने प्रयास करावा – प.पू.प्रतिभाकुंवरजी म.सा.

एमपीसी न्यूज – मानवाला देवाने जन्माला घातले की नाही हे माहिती नाही? परंतू प्रत्येक देवाला मात्र मातेने जन्म दिला आहे. संसारी चक्रात माता-पित्यांएवढे महत्व कोणालाच नाही. तुम्ही कोणत्या जाती, धर्म, पंथात जन्म घेतला हे महत्वाचे नाही. कोणत्याही जाती धर्माचे नागरिक म्हणून आपली प्रतिमा करू नका, परंतू मातेचा ‘श्रावणबाळ’ होण्यासाठी प्रत्येकाने प्रयास करावा, असे मत प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज यांनी सांगितले.

निगडी प्राधिकरणातील वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने पाटीदार भवन येथे पवित्र चातुर्मास महिन्यानिमित्त प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांचे विशेष प्रवचन आयोजित केले होते. यावेळी प.पू. प्रफुल्लाजी म.सा., प.पू. हंसाजी म.सा., प.पू. पुनितीजी म.सा., प.पू.गरिमाजी म.सा., प.पू.महिमाजी म.सा. आदी ठाणा 6 तसेच संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा आदी उपस्थित होते.

प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज  म्हणाल्या की, महिलांनी आपल्या पोटी श्रावणबाळ जन्मावा अशी अपेक्षा ठेवणे गैर नाही. परंतू प्रथम आपल्या पतीला ‘श्रावणबाळ’ समान आई वडीलांची सेवा करण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. असे झाले तर प्रत्येक कुटुंबातील सासू सुनेचे नाते आई मुलीप्रमाणे प्रेमाचे होईल आणि धर्तीवरच स्वर्ग सुखाची प्राप्ती होईल, असेही प्रतिभाकुंवरजी म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.