Nigdi : सैन्य दलातील करीयरच्या संधी व परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी रविवारी निगडीत मेळावा  

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर (Nigdi) मंडळातर्फे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एन. डी.ए. च्या आगामी प्रवेश परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी वर्ग घेतले जाणार आहे. एन. डी.ए.  तसेच सैन्य दलातील  करीयरच्या संधी, प्रवेश प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी रविवार दि..23 एप्रिल 2023 रोजी विद्यार्थी आणि पालकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे यांनी दिली.

  स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ येथे सकाळी दहा ते साडे बारा या वेळेत होणाऱ्या मेळाव्या मध्ये ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन आणि ब्रिगेडियर बलजितसिंग गिल हे विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. मंडळाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत सप्टेंबर 2023 मध्ये एन. डी.ए.  परीक्षा पूर्व तयारीसाठी 28 एप्रिल पासून 50 दिवसांचा नाममात्र शुल्कामध्ये मार्गदर्शन वर्ग सुरु केला जाणार आहे. त्याबाबत विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला जाणार आहे. गेल्या 39 वर्षापासून स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जातात. मंडळातर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालविले जाते. त्यामाध्यमातून  अभ्यासिका, ग्रंथालय नाममात्र शुल्कामध्ये उपलब्ध  करून दिले जाते. ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थीना सहज व कमी खर्चात मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मंडळाकडून केला  जातो. दरवर्षी घेत असलेला हा प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून सहा विद्यार्थी   एन. डी.ए.  मध्ये दाखल झाले आहेत.

Pimpri : भांडणाचा जाब विचाराला म्हणून एकाला बेदम मारहाण

 

 एन. डी.ए.  पूर्व परीक्षेच्या वर्गासाठी शहराबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात. या वर्गासाठी फक्त 40 विद्यार्थी प्रवेश मिळणार असून आर्थिक दृष्ट्या परवडणारा हा वर्ग असेल अशी दक्षता मंडळाकडून घेतली जाते. गरजूंना काही अटीवर शुल्कात सवलत दिली जाते. राज्यभरातील विद्यार्थी येत असल्याने गरज असल्यास त्यांच्या निवासाची व्यवस्था मंडळाकडून केली जाणार आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी 8446422965, 8698695246 किंवा 9881466372 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आव्हान मंडळाचे सचिव सागर पाटील आणि रमेश बनगोंडे यांनी (Nigdi) केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.