Pimpri : भांडणाचा जाब विचाराला म्हणून एकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – पुतणी सोबत झालेल्या भांडणाचा जाब (Pimpri) विचारायला गेलेल्या चुलत्यालाच तिघांनी बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार पिंपरीतील रमाबाई नगर येथे 11 एप्रिल रोजी घडला होता.

याप्रकरणी बुधवारी (दि.18) शशिकांत ईश्वर सोनावणे (वय 45 रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून उज्वल लव्हे, सरोज वाघमारे व बळी रोकडे (सर्व रा. पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Pune : प्रशांत जगताप यांनी अंध विद्यार्थ्यांसमवेत साजरा केला वाढदिवस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पुतणी सोबत झालेल्या भांडणाचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी गेले असता आरोपींनी फिर्यादी यांना हाताने व लाथा बुक्क्यांनी (Pimpri) मारहाण करत दुखापत केली आहे. यामध्ये फिर्यादी यांचे ढातीचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.