Punawale : महिलेशी गैरवर्तन करणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज – पुनावळे येथील सीएनजी पंपावर महिलेला शिवीगाळ (Punawale) करत तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या इसमाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. हि घटना मंगळवारी (दि.18) घडली.

Nigdi : सैन्य दलातील करीयरच्या संधी व परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी रविवारी निगडीत मेळावा  

यावरून पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून विक्रम लालजी दिक्षीत (वय 38 रा.आंबेगाव) असे अटक केलेल्या  आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएनजी पंपावर पीडित महिला या त्यांच्या कारमध्ये सीएनजी गॅस भरत होत्या. यावेळी आरोपी त्यांची गाडी घेऊन मागून आला व त्याने पीडितेला शिवीगाळ कऱण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने पीडितेचा हात ओढून दमदाटी केली.यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत (Punawale) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.