Nigdi : प्रेम भावनेचा दीपक लावून क्षमा करणे हे मैत्रीभावाचे प्रतीक – साध्वी डॉ. संयमलताजी

एमपीसी न्यूज – क्षमापना पर्वात (संवत्सरी पर्व) सुईसमान  (Nigdi) सर्वांना जोडण्याचे काम करा. कात्री बनून नातेसंबंध तोडू नका. सगळे वैरभाव विसरून शत्रूला पण माफ करा. चूक माणसाकडूनच होऊ शकते. परंतु त्याला माफ करणे ही दैवी शक्ती आहे. क्रोध आणि अहंकाराचा दीपक विझवून आपल्या मनात प्रेम भावनेचा दीपक लावा. क्षमा करणे हे मैत्रीभावाचे प्रतीक आहे. सर्व जीव एकसमान आहेत . सर्व प्राणीमात्रांसोबत माझे मैत्रीभाव आहेत. अशी भावना ठेवल्यास जीवन सुगंधित आणि पल्लवित होईल, असे साध्वी डॉ.संयमलताजी यांनी आपल्या प्रवचनात सांगितले.

निगडी-प्राधिकरण येथील पाटीदार भवन येथे दक्षिण चंद्रिका साध्वी डॉ. संयमलताजी म. सा. आदी ठाणा चार यांचा जैन चातुर्मास सुरू आहे. आज जैन समाजाच्या संवत्सरी पर्वानिमित्त निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साध्वी संयमलताजी यांचे विशेष प्रवचन आयोजित करण्यात आले होते.

त्यावेळी त्या बोलत होत्या. अमितप्रज्ञाजी म. सा., कमलप्रज्ञाजी म. सा., सौरभप्रज्ञाजी म.सा. आदींच्या सान्नीध्यात हे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी मोठ्या संख्येने जैन भाविक उपस्थित होते.

संवत्सरी पर्वानिमित्त “आलोयणा” आणि ‘प्रतिक्रमण” करून सर्व जीवांकडे क्षमायाचना करण्यात आली.साध्वी कमलप्रज्ञाजी यांनी अंतगड सूत्राचे पठण केले. ‘रात्र झाली सकाळ’ या विषयावर एका सुंदर नाटिकेचे आयोजन करण्यात आले होते. जैन भाविकांनी याप्रसंगी गेल्या वर्षभरात केलेल्या पापांची आलोचना करुन सर्व जीवांकडे क्षमायाचना केली.

Theur : चिंचवड देवस्थानच्या वतीने थेऊरच्या श्री चिंतामणीची महापूजा संपन्न; भाविकांची मोठी गर्दी

पर्युषण महापर्वाच्या 8 दिवसात 25 पेक्षा अधिक जैन भाविकांनी तप साधना केली. निगडी-प्राधिकरण जैन श्रावक संघाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. साध्वी संयमलताजी म.सा. यांच्या प्रेरणेने आणि निगडी-प्राधिकरण जैन श्रावक संघाच्या अथक परिश्रमाने स्थानक भवनाच्या नवीन इमारत बांधकामासाठी ट्रस्टची स्थापना करण्यात आली.

तसेच यावेळी देखील निधी संकलित करण्यात आला. त्याचप्रमाणे स्थानक भवन निर्मितीची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी एका मंगल कलशची बोली देखील झाली. रात्री संवत्सरी प्रतिक्रमणद्वारे सर्व जीवांकडे क्षमेची मागणी करण्यात आली.

निगडी-प्राधिकरण जैन श्रावक संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा, चातुर्मास कमिटी अध्यक्ष मनोहरलाल लोढा, महामंत्री सुभाष ओसवाल, खजिनदार संतोष गुगळे, कार्याध्यक्ष मनोज सोळंकी, स्वागताध्यक्ष राजेंद्र मुनोत यांच्यासह अन्य विश्वस्त मंडळींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.