Theur : चिंचवड देवस्थानच्या वतीने थेऊरच्या श्री चिंतामणीची महापूजा संपन्न; भाविकांची मोठी गर्दी

एमपीसी न्यूज : आज भाद्रपद शुद्ध गणेश (Theur ) स्थापनेचा दिवस. आज पहाटे चिंचवड देवस्थानच्या वतीने श्री चिंतामणीची महापूजा करण्यात आली. पहाटेपासूनच श्रींच्या दर्शनासाठी गणेश भक्तांनी मंदिरात गर्दी केली होती. पिरंगुटकर देव मंडळी व थेऊर ग्रामस्थ यांनी भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून चतुर्थीपर्यंतची द्वार यात्रा केली.
पहिला दिवस कोरेगाव मूळ ओझराई, दुसरा दिवस आळंदी (म्हतोबाची) येथील आसराई माता, तिसरा दिवस मांजरी मांजराई माता, चौथा दिवस थेऊर महातारी आई अशी यात्रा पार पडली.
सद्गुरू मोरया गोसावी महाराज यांच्या पूजेतील मूर्ती घेऊन पिरंगुटकर देव मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सद्गुरू मोरया गोसावी यांनी या चार ठिकाणी श्रींची स्थापना केली. आज पिरंगुटकर देव मंडळींनी श्री चिंतामणीला अभिषेक व महापूजा केली.
Sangavi : सनातन भक्तीचे फळ भावी पिढीच्या हिताचे – पंडित प्रदीप मिश्रा
पंरपरे प्रमाणे श्री चिंतामणीला छत्तीस भोगांचा नैवेद्य दाखविण्यात आला. उरळीकर प्रकाश महाराज देव यांनी ही श्रींची महापूजा केली. तसेच सायंकाळी सभा मंडपात श्री चिंतामणी भजनी मंडळाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी चिंचवड देवस्थान चे विश्वस्त हभप आनंद महाराज तांबे व ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते.
सद्गुरू मोरया गोसावी यांचे पुत्र चिंतामणी महाराज व नातू नारायण महाराज यांनी रचलेली एकवीस पदांची धुपारती चतुर्थीला रात्री सुरू होऊन पहाटे संपन्न होत आहे. तद्नंतर पहाटे श्री चिंतामणी दृष्ट काढण्यात येणार.
पंचमीला पहाटे मटकीच्या प्रसादाने चार दिवसांच्या उपवासाची (Theur) सांगता होणार आहे. यावेळी पिरंगुट देवांपैकी अरुण महाराज देव, शशांक देव, गणेश देव, नारायण देव यांच्यासह कुटुंबीय उपस्थित राहतील.