Theur : थेऊरमध्ये श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज – थेऊर येथे आज (दि.2) भाद्रपद महिन्यातील (Theur) संकष्टी चतुर्थी ,पितृ पक्षातील या चतुर्थी ला मंदिरात भाविकांचा ओघ काहीसा कमी असतो. परंतु गांधी जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे पहाटे पासूनच श्री चिंतामणीच्या दर्शना करिता  भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

आज पहाटे आगलावे यांनी श्रींची पूजा केली. चिंचवड देवस्थानच्या (Theur) वतीने पूजा करण्यात आली.यावेळी चिंचवड देवस्थान चे विश्वस्त ह भ प आनंद महाराज तांबे उपस्थित होते.चिंचवड देवस्थान व आगलावे बंधू यांच्या वतीने मंदिर प्रांगणात मंडप घालण्यात आला व भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.

Talegaon Dabhade : हातगाडी पासून मोठ्या व्यावसायिकांपर्यंत पतसंस्थेचा हातभार – विलास काळोखे 

दुपारी देवस्थानच्या वतीने भाविकांना उपवासाची खिचडी व चिवडा या प्रसादाचे वाटप करण्यात आले.सायंकाळी ह भ प संतोष महाराज कांबळे ( इंदापूर ) यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न होणार आहे.रात्री चंद्रोदया नंतर श्रीं चा छबिना निघणार असून त्यानंतर उपस्थितांना महाप्रसाद देण्यात येईल.

लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.ग्रामपंचायती तर्फे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली.सर्व व्यवस्थेवर विश्वस्त आनंद महाराज तांबे लक्ष ठेवून (Theur)  होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.