Dehuroad : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूजपुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एका व्यक्तीला (Dehuroad)अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. 30) रात्री अकरा वाजताच्या सुमारास मंगलम सोसायटी समोर, देहूरोड येथे घडली.

पोलीस अंमलदार किशोर बोंडे यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नाही.

Talegaon : ‘रक्त नालियों में नहीं, नाड़ियों में बहाना चाहिए’ – निरंकारी बाबा

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुबई द्रुतगती मार्गावर(Dehuroad) मंगलम सोसायटी समोर अपघात झाल्याची माहिती देहूरोड पोलिसांना मिळाली. त्यानुसार फिर्यादी पोलीस अंमलदार बोंडे आणि त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

अज्ञात वाहनाने एका व्यक्तीला धडक दिली होती. धडक बसलेली व्यक्ती गंभीर जखमी झाली होती. त्या व्यक्तीला पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी पूर्वीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.