NCP : महात्मा गांधी स्मारकाचे काम दोन महिन्यात सुरू करा; अन्यथा…

एमपीसी न्यूज -पिंपरी-चिंचवड महापालिकेने (NCP ) मोरवाडी येथील महात्मा गांधी स्मारकाचे काम दोन महिन्यात सुरू करावे. अन्यथा लोकवर्गणीतून स्मारक उभे केले जाईल असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी म्हटले.

संपूर्ण देश राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 154 वी जयंती साजरी करत असताना पिंपरी-चिंचवड शहरात अद्याप त्यांचे स्मारक नसल्याचे सांगत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नियोजित महात्मा गांधी यांच्या स्मारकाच्या जागेवर आंदोलन केल गेले. शहराध्यक्ष तुषार कामठे, महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले गेले.

बी. आर. माडगूळकर, प्रा. बी. डी. खरे, संदीप चव्हाण, अनिल भोसले, राजेश हरगुडे, विजय पिरंगुटे, सुदाम शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ओम शिरसागर, विकास कांबळे शाहिद शेख,रजनीकांत गायकवाड, मेघराज लोखंडे, पियूष अंकुश,मयूर खरात अजय पवार, राहुल नेवाळे, प्रशांत सकपाळ, शारदा चौकसी, रेखा मोरे,अलका कांबळे,जयश्री झेंडे या महिला पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने युवक पदाधिकारी उपस्थित होते.

इम्रान शेख म्हणाले “राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसेला आदर्श मानणारे व त्याचे उदात्तीकरण करणाऱ्यांची सत्ता गेले पाच वर्षे या महापालिकेत होती. त्यांनीच जाणीवपूर्वक गांधी यांचे स्मारकाचे काम रोखले. गेल्या दहा वर्षापासून शहरातील गांधी प्रेमी यांच्या पाठपुराव्याला महापालिका सातत्याने केराची टोपली दाखवत असून आता यापुढे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शांत बसणार नाही.

येणाऱ्या दोन महिन्यात महापालिका आणि बिर्ला ग्रुप यांनी स्मारकाचे काम सुरू केले नाही. तर शहरातील गांधीप्रेमी यांना घेऊन (NCP ) राष्ट्रवादी युवक काँग्रेस गांधी यांनी दाखविलेल्या सविनय कायदेभंगाच्या मार्गाने जागेचा ताबा घेत लोक वर्गणीतून स्मारक उभे करण्याची भूमिका घेईल.

Dehuroad : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आंदोलनास पाठिंबा देत भाजपच्या अनागोंदी कारभारावर जोरदार टीका केली. सत्ताधारी भाजपाला महात्मा गांधी यांच्या नावाची ॲलर्जी असून स्मारक बनविण्यासाठी जागा देण्यास टाळाटाळ केली होती. परंतु लोकांच्या मागणीमुळे जागा दिली असल्याची टीका करत स्मारकाचे काम त्वरित झाले पाहिजे अशी मागणी कामठे यांनी केली.

कामगार नेते काशिनाथ नखाते, महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर, विद्यार्थी अध्यक्ष राहुल आहेर, ओबीसी अध्यक्ष विशाल जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.