Nigdi : ‘एमपीसी न्यूज इम्पॅक्ट’, बेकायदा बांधकाम महापालिकेने थांबविले

एमपीसी न्यूज – निगडी, सेक्टर 26 गणेश तलाव येथील संत रविदास मंदिरालगत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जागेवर बेकायदेशीर बांधकाम सुरु असल्याचे वृत्त ‘एमपीसी न्यूज’ने दिले होते. त्यानंतर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना ते काम थांबविले आहे. बांधकाम परवानगी घेतल्याशिवाय काम करु नये असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

निगडी, संत रविदास मंदिरालगत प्राधिकरणाची जागा आहे. ती जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाकडून जागेची देखभाल केली जाते. या जागेवर बेकायदेशीर बांधकाम सुरु आहे. सेक्टर 26 गणेश तलाव येथील संत रविदास मंदिरालगत सुरु असलेले बेकायदा बांधकाम थांबविण्याबाबत महापालिकेच्या सारथी हेल्पलाईवर तक्रार केली आहे. परंतु, त्याची दखल घेतली जात नाही. त्याउलट बांधकाम जोरात सुरु आहे. या बेकायदा बांधकामाला काही राज्यकर्ते आपला शासकीय निधी देणार असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला होता. याबाबतचे वृत्त चार दिवसांपूर्वी ‘एमपीसी न्यूज’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर महापालिकेने हे काम थांबविले आहे.

याबाबत बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, “प्राधिकरण परिसरातील गणेश तलाव येथे बेकायदा बांधकाम सुरु होते. महापालिकेने याची दखल घेऊन काम थांबवायला सांगितले आहे. बांधकाम परवानगी घेतल्याशिवाय काम करु नये असे निर्देश देण्यात आले आहेत”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.