Nigdi News: स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे एक कला व ज्ञानवर्धक स्पर्धा; ‘प्राणवायू’वर व्हिडिओ पाठविण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – निगडी, प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ पुरस्कृत व आई निर्मिती संस्थेतर्फे निसर्ग संवर्धन काळाची गरज या विषयावर एक कला व ज्ञानवर्धक स्पर्धेचे आयोजन केले आहे. ‘प्राणवायू’ यावर  दोन मिनिटापर्यंतचा कथा, कविता, लेख, नृत्य, गीत, मुक अभिनय असलेला एक व्हिडिओ तयार करून  तो  पाठवण्याचे आवाहन केले आहे.

वय वर्ष 18 च्या आतील मुलांकरिता ही स्पर्धा आहे. स्पर्धेचा विषय प्राणवायू असणार आहे.  प्राणवायूचे महत्त्व, शरीरातील प्राणवायूचे प्रक्रिया स्वरुप, प्राणवायूचे उगम स्त्रोत कोणकोणते?, प्राणवायू साठवण्याची प्रक्रिया कशी असते? प्राणवायू वाढवण्याचे उपाय व पर्याय,  प्राणवायू, निसर्ग किंवा मानव निर्मित (महत्व आणि फरक) यावर मराठी, हिंदी, इंग्रजी कोणत्याही भाषेत व्हिडीओ तयार करावा.

व्हिडिओ दोन मिनिटापर्यंतचा कथा, कविता, लेख, नृत्य, गीत, मुक अभिनय असलेला असावा. तो व्हिडीओ [email protected] या इमेलवर अथवा 9226789883 या व्हाट्स ॲप क्रमांकवर पाठवावा. व्हिडिओ पाठवताना स्पर्धकाचे नाव, वय व संपर्क क्रमांक द्यावा. प्रथम क्रमांक येणाऱ्याला 1000 हजार, द्वितीय क्रमांक 750 रुपये आणि तृतीय क्रमांकाला  500 रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

बालमित्रांनी प्राणवायू  या विषयला अनुसरून या आणि अश्या स्वरूपातील जे काही प्रश्न तुमच्या मनात उपस्थित होतील.  त्याची उकल होण्यासाठी व जनसामान्यामधे त्या विषयाची जागरूकता निर्माण व्हावी. अश्या प्रकारचे सादरीकरण वरील देलेल्या कोणत्याही प्रकारात व्हिडीओ बनवून आम्हाला पाठवा. चित्रफित मात्र जास्तीत जास्त 2 मिनिटांचीच असावी.

व्हिडीओ पाठवण्याची अंतिम तारीख 15 जून 2021 आहे. अंतिम तारखेनंतर सर्व व्हिडीओ संस्थेच्या युट्युब चॅनलवर उपलोड केले जातील. प्रत्येक स्पर्धकाला त्याच्या व्हिडीओची युट्युब लिंक देण्यात येईल. दिलेली युट्युब लिंक स्पर्धकांनी पुढे फॉरवर्ड करायची आहे. तुमच्या व्हिडिओवरील आवड (likes),पाहणे (views),अभिप्राय (comments) या निकषांच्या आधारे स्पर्धक विजयाचे मानकरी ठरतील.)

अधिक माहितीसाठी समिर मुल्ला  9226789833 आणि विनीत दाते यांच्याशी 9960472514 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.