Nigdi News: ग्रामीण ग्रंथालयांना देणार ग्रंथभेट

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर  सावरकर मंडळाच्या रवींद्रनाथ ठाकूर ग्रंथालयाच्या 39 व्या वर्धापनदिनानिमित्त पुणे जिल्ह्यातील 2 ग्रंथालयांना त्यांच्या बाल वाचकांसाठी प्रेरणादायी, संस्कारक्षम अशा पुस्तकांच्या रूपाने मदत केली जाणार (Nigdi News ) आहे. त्यासाठी गरजू ग्रंथालयांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

निगडी प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर  सावरकर मंडळाच्या रवींद्रनाथ ठाकूर ग्रंथालयातर्फे ग्रंथालयाचा 39 सावा  वर्धापनदिन 14 फेब्रुवारी 2023 रोजी संपन्न होत आहे. वर्धापनदिनाच्या निमित्ताने ग्रंथालयाच्या वतीने दरवर्षी  ग्रामीण भागापर्यंत वाचन संस्कृती पोहचवण्यासाठी दोन लहान गरजू  ग्रंथालयांना पुस्तकांच्या रूपाने मदत केली जाते. गेली 11 वर्षे हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे.

Pimpri News : किवळे येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 

यावर्षी देखील पुणे ग्रामीण भागातील 2 ग्रंथालयांना त्यांच्या बाल वाचकांसाठी प्रेरणादायी, संस्कारक्षम अशा पुस्तकांच्या रूपाने मदत करण्याचे ठरविले आहे. अशी मदत हवी असणाऱ्या ग्रंथालयांनी कृपया ग्रंथालय कार्यवाह प्रदीप पाटील (भ्रमण ध्वनी  9822604751) यांच्याशी किंवा प्रत्यक्ष ग्रंथालयात 31 जानेवारी 2023 पर्यंत संपर्क करावा असे आवाहन रवींद्रनाथ ठाकूर ग्रंथालय, प्राधिकरण, निगडी यांच्या वतीने करण्यात (Nigdi News )आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.