Nigdi news: नवरात्री निमित्त ‘नवदुर्गा पुरस्कारा’ने महिलांचा गौरव

एमपीसी न्यूज – नवरात्री निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निगडी, यमुनानगर प्रभाग 13 मधील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा ‘नवदुर्गा’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी सन्मान चिन्ह देऊन महिलांचे कौतुक करण्यात आले.

हा समारंभ नुकताच निगडीत संपन्न झाला. नगरसेविका सुमन पवळे, कमल घोलप, चांगदेव कोलते, रेश्मा साळवी, नलिनी साळी, आशा कदम, सारिका चव्हाण, मंगल साबळे, असिफा बागवान, सरिता देशमुख, सायली आवटी, प्रियंका वाबळे, शीतल आंबले, प्रिया कोलते, सानिका कोलते, संदीप पाटील,
वसीम बागवान, निखिल निकाळजे, निशांत निकाळजे, सचिन सुर्यवंशी, रोहित साळवी, सोहेल शेख, सौरभ उजगरे, गणेश कुंभार, ओमकार वडके आदी उपस्थित होते.

या प्रसंगी सुहासिनी वैद्य, स्वामिनी पावनामीता प्रना, इंदुलेखा जयशंकर, ज्वाला नायर, छाया हब्बू, सुकेशा मेंडॉन, स्वाती देशपांडे, रेखा जाधव, लीना वर्तक (शिक्षण), चैत्राली राजापूरकर (पत्रकार), सुमन रत्नाप्पा बिडवे ( स्वच्छता), मीनल शुक्ल, कांचन जगताप, आशा बेंद्रे, अनिता सरोटे, आशा कदम, श्वेता भावसार, मनीषा पगार, अस्मिता शेंडगे, मीनाक्षी भिस्ते, विद्या पोटफोडे, संगीता फडके (व्यवसाय), वैशाली भोईटे, नलिनी साळी , सुप्रिया केंदळे, सारिका कोलते , संगीता खरात , आशा शेळके , डिगा उदय कुमार , रेखा सुर्वे (सामाजिक), श्वेता कदम, अंजुम शेख, अनिता लांडे (क्रीडा), ऋतुजा राजेश साळवे ,  विशाखा धनाजी मोरे (कला), डॉ.मृणाल राजेंद्र त्रंबके , अमृता कुलकर्णी , अंजली आशिष पांडे, डॉ. प्रिया नायर , डॉ.अश्विनी तपशाळकर, डॉ. प्रणाली धस , सीमा राणे (वैद्यकीय), सुमन पवळे, कमल घोलप ,रेश्मा साळवी, सारिका चव्हाण, सुलभा उबाळे, अश्विनी चिखले (राजकीय), वर्षारानी घाटे (पोलीस), अनिता शर्मा (सांस्कृतिक) यांचा गौरव करण्यात आला.

राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रसाद कोलते यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.