Nigdi: संतपीठातील पंचरत्नांना स्वातंत्र्यवीर सावरकर भाषा पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज -निगडी येथे स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिन सप्ताह समारंभ (Nigdi)निमित्त पिंपरी चिंचवड शहरामध्ये सावरकर दौड भक्ती- शक्ती उद्यान निगडी पासून ते स्वातंत्र्य वीर सावरकर उद्यान पर्यंत घेण्यात आली.

कार्यक्रमासाठी उदघाटक भोसरी विधानसभेचे आमदार महेश दादा लांडगे,प्रमुख (Nigdi)उपस्थिती म्हणून सावरकर घराण्याचे वंशज असिलता सावरकर राजे, सात्यकी सावरकर अध्यक्ष सुनील देवधर आदी दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितित हा सोहळा संपन्न झाला.

Pune: संतपीठ मध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

त्यावेळी संस्कृताचार्य ह.भ.प. डॉ. गोरक्षनाथ महाराज उदागे (आळंदी) यांनी संकृत भाषेचे महत्व सांगितले.जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँड ज्यु. कॉलेज हे सी.बी.एस.सी. अभ्यासक्रमावर आधारित असून सदर शाळेमध्ये मराठी, संकृत, हिंदी, इंग्रजी या चार भाषेबरोबर संत
साहित्याचे ज्ञान ही दिले जाते.

 

या अनुषंगाने जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँड ज्यु. कॉलेज चिखली येथील मराठी विषय शिक्षिका सौ. शोभा शिर्के सौ. ज्योती लोखंडे, सौ.मंगल आंब्रे, संस्कृत शिक्षक श्री. सखाराम पितळे, श्री.भालचंद्र रोडे यांनास्वातंत्र्यवीर सावरकर भाषा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.