Nigdi : ओटा स्किम परिसरात पिंपरी-चिंचवड पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

56 गुन्हेगारांना घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज – निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केले. यामध्ये पोलिसांनी 129 गुन्हेगारांची यादी तयार केली. त्यातील 56 गुन्हेगारांना प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई आज (शुक्रवारी) पहाटे करण्यात आली.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, गुन्हेगारी घटनांना आळा बसावा यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात सुरुवात केली आहे. याअंतर्गत आज पहाटे निगडी मधील ओटास्कीम परिसरामध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. खंडणी विरोधी पथक, आर्थिक गुन्हे शाखा, गुन्हे शाखा युनिट एक आणि दोन, तसेच बारा पोलीस ठाण्यातील 309 कर्मचारी व 55 अधिकारी या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सहभागी झाले. पोलिसांनी 56 गुन्हेगारांना ताब्यात घेतले. निगडी पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.