Nigdi : स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेस सुरुवात

पाच दिवसीय व्याख्यानमालेत होणार विविध विषयांचा उहापोह

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेस बुधवारी (दि. 1) सुरुवात झाली. व्याख्यानमालेचे प्रथम जर्मनी येथे आयर्नमॅन स्पर्धा पार केलेले आयर्नमॅन रोहन कुंभार यांनी गुंफले. ‘तुम्ही पण होऊ शकता आयर्नमॅन’ या विषयावर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. व्याख्यानमालेचे यंदा 35 वे वर्ष आहे.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जनसेवा बँकेचे संचालक ऍड सतीश गोरडे उपस्थित होते. गोरडे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला म्हणून नावारूपास आलेली ही व्याख्यानमाला आहे. व्याख्यानाला तरुणांचा सहभाग वाढावा, यासाठी अशा प्रकारच्या विषयांची निवड करण्यात आली आहे.”

रोहन कुंभार म्हणाले, “आयर्नमॅन हे अमेरिकन गेम आहे. अमेरिकन नेव्ही कमांडरने या स्पर्धेला आयर्नमॅन हे नाव दिले आहे. यशस्वी होण्यासाठी दिनचर्या ठरवायला हवी. रोजच्या नियमित कामांचे वेळापत्रक ठरवून काम करावे. धकाधकीच्या जीवनात स्ट्रेस मॅनेजमेंट करणे अत्यंत महत्वाचे आहे. संतुलित आहाराचे महत्व लक्षात घेऊन योग्य आहार घ्यायला हवा. शरीराला व्यायामाची सवय असणे फार महत्वाचे आहे. करिअर करण्यासाठी लहानपणापासून नियोजन आणि त्यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे” असेही ते म्हणाले. यावेळी उपाध्यक्ष सदाशिव रिकामे, श्रीकांत मापारी, राजाभाऊ गोलांडे, विजय सिनकर, भारती फरांदे, रविकांत कळंबकर आदि मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक विनोद बन्सल यांनी केले. आभार भास्कर रिकामे यांनी मानले. प्रदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तर श्रीकांत मापारी यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.