Pimpri : सोमवारपासून पिंपरी-चिंचवड शहरात होणार एक दिवसाआड पाणीपुरवठा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये 29.93 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने येत्या सोमवार (दि. 6) पासून शहरात एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

पवना धरणामध्ये 1 मे 2018 रोजी 37.70 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यावर्षी 1 मे 2019 रोजी मात्र हा पाणीसाठा केवळ 29.93 टक्के शिल्लक आहे. मागील वर्षी पावसाळ्यात परतीच्या मान्सूनचा पाऊस न झाल्याने आता धरणात कमी पाणी आहे. जलसंपदा विभागाने पाणीकपात करणेबाबत महानगरपालिकेस वारंवार कळविले आहे. जलसंपदा विभागाच्या सुचनेनुसार 1 मार्च पासून शहरामध्ये सर्व भागात वेगवेगळ्या वेळी ‘आठवड्यातून एक दिवस पाणी बंद’ या तत्वावर पाणीकपात सुरू करण्यात आली आहे.

पवना धरणातील पाणीसाठी 30 टक्क्यांच्या खाली आला आहे. उन्हाचे प्रमाण वाढल्याने बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. पावसाची देखील यंदा अनिश्चितता आहे. या पार्श्वभूमीवर, सध्याच्या पध्दतीने पाणीवापर सुरू ठेवल्यास धरणातील पाणी 30 जून पर्यंतच पुरणार आहे. उपलब्ध पाणी 30 जुलैपर्यंत पुरण्यासाठी दैनंदिन पाणीपुरवठ्यामध्ये सर्वसाधारणपणे 25 ते 30 टक्के कपात करणे आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड शहरात दैनंदिन पाणीपुरवठ्यामध्ये 25 टक्क्यांपेक्षा जास्त कपात केल्यास उंचावरील भागात कमी पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे कपातीनंतर देखील सर्व नागरीकांना व्यवस्थित पाणी मिळावे, यासाठी पाणीपुरवठा विभागाने सर्व शहराला ‘एक दिवस आड पाणीपुरवठा’ करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी येत्या सोमवार (दि. 6) पासून होणार आहे. पाणीटंचाईची ही पार्श्वभूमी लक्षात घेता नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरावे, तसेच घरातील इमारतीमधील गळत्या बंद कराव्यात, सार्वजनिक ठिकाणांवरील गळत्यांविषयी महापालिकेस कळवावे: असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

पहिल्या दिवशी पाणीपुरवठा होणारा भाग (सोमवार, दि. 6 मे)

# किवळे – किवळेगाव, मासुळकर फार्म, कोतवालनगर, शळकेवस्ती, आदर्शनगर, भिमाशंकरनगर, दत्तनगर, श्रीनगर, इंद्रप्रभा सोसायटी, उत्तमनगर, बापदेवनगर, सिध्दीविनीयक कॉलनी
# रावेत भाग (स.न.96 वरील) – रावेत गावठाण, एस.बी. पाटील शाळा परिसर, लक्ष्मीनगर, भोंडवेनगर, तुपेवस्ती, म्हस्केवस्ती, बी.आर.टी.एस. रस्ता.
# रावेत भाग (से.क्र.29 वरील इस्कॉन सह) – इस्कॉन मंदिर परिसर, चैतन्य पार्क, नवशांती निकेतन, डी.वाय. पाटील कॉलेज रोड
# शिंदेवस्ती – शिंदेवस्ती व परिसर
# बिजलीनगर, वाल्हेकरवाडी टाक्या – बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, शिवनगरी, बळवंतनगर, साईला कॉम्लेक्स, रजनिगंधा सोसायटी, चिंतामणी मंदिर परिसर, शिवाजी पार्क, अथर्व पार्क, रेलविहार
# पिंपरी डिलक्स टाकी – बी ब्लॉक 8, 9 ते 31 पर्यंत, भाटनगर 16 नंबर बिल्डींग ते डिलक्स चौक, शनिमंदिर समोरीलभाग, सी ब्लॉक 1 ते 11 पर्यंत, मिलिंदनगर बिल्डींग 1 ते 17, जिजामाता हॉस्पिटल परिसर, वाघेरे कॉलनी 1,2,3, 4 परिसर
# अशोक थिएटर टाकी – पिंपरी एच.बी. ब्लॉक, हेमुकलानी गार्डन, तपोवन रोड, जाधव हारवाले, पडाळ नं.1,2,3,4 नवमाहाराष्ट्र गेट समोरील भाग, शनिमंदिर पाठीमागचा भाग, आयप्पा मंदिर पिरसर, डेअरी फार्म रोड, सिक्कीबाई, पदम सोसायटी लाईन
# नवमहाराष्ट्र टाकी व बायपास – बालामल चाळ, भिमनगर, नाणेकर कॉम्पेक्सच्या पाठीमागचा भाग, भैरवनाथनगर
# पिंपरी बायपास – पिंपरी डिलक्स टाकीवर असणारा भाग
# पिंपळे सौदागर टाकी – सौदागर गावठाण, विश्वशांती कॉलनी, केशवनगर, काटेवस्ती सोसायटी परिसर.
# वैदुवस्ती, सुदर्शननगर बायपास – वैदुवस्ती, सुदर्शननगर, सिंहगड कॉलनी, जवळकरनगर
# प्रभातनगर बायपास – प्रभातनगर परिसर
# दापोडी टाक्या – दापोडी गावठाण, बॉम्बे कॉलनी, एस.एम. कॉलनी, सिध्दार्थनगर, गुलाबनगर, फुलेनगर, काटेवस्ती, दापोडी पाण्याच्या टाक्या जवळील सोसायट्या, आनंदवन, आवेलॉन सिटी सोसायटी
# रहाटणी बायपास – रहाटणी गावठाण परिसर
# थेरगाव गावठाण टाक्या – समता कॉलनी, ममता कॉलनी, एकता कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, संदीपनगर, दत्त कॉलनी, स्विस काऊंटी परिसर, वहिनीसाहेब कॉलनी, दगडू पाटील नगर, पानसरे कॉलनी, थेरगाव गावठाण, विजयनगर
# नायडू टाकी – काळेवाडी – तापकीरनगर
# श्रीनगर टाकी, रहाटणी क्रमांक दोनची टाकी – गजानन नगर, शास्त्री नगर, तांबे शाळा परिसर, श्रीनगर परिसर, साई कॉलनी परिसर, कुणाल हॉटेल ते नखातेवस्ती लिंक रोड परिसर, हॅप्पी थॉटस् परिसर, नखातेवस्ती परिसर, कोकणे चौक परिसर, राम नगर, रहाटणी चौक परिसर, शिवसाई रोड परिसर
# कुणाल आयकॉन टाकी – फाईव गार्डन सासायटी, मनमंदीर सोसायटी, शिवार हॉटेलच्या मागील भाग, कोकणेचौक परिसर, कुणाल आयकॉन सोसायटी रोड, रोजवूड सोसायटी परिसर
# वाकड बायपास (भाऊसाहेब कलाटेनगर) – नंदनवन कॉलनी, नंदन इनस्पेरा, कोस्टारिका, सुकासा, पलाश, दत्त मंदिराच्या पाठीमागचा भाग
# वाकड बायपास (सदगुरू, सुदर्शन, आदर्श कॉलनी, म्हातोबानगर, Capital Tower) – सदगुरू कॉलनी 1,2,3, सुदर्शन कॉलनी 1 ते 6, भिंगारे कॉर्नर, कॅपिटल टॉवर, वाकड गावठाण, म्हातेबानगर झोपडपट्टी
# गणेशनगर टाकी – गणेशनगर, शिव कॉलनी, मंगलनगर, वेणूनगर. महादेव कॉलनी, एकता कॉलनी इत्यादी चौधरी पार्क वाकड, पिंक सिटी रोड वाकड
# ई-एक – प्राधिकरण से.क्र.27,27-अ, 28, निगडी (गावठाण) ओटा (आकुर्डी) से.क्र.24 (भाग) प्राधिकरण – से.क्र.23, 26, से.क्र.28 (भाग), सिध्दीविनायकनगरी परिसर
# खंडोबा माळ ESR -1 – आकुर्डी (गावठाण), विठ्ठलवाडी, श्रीकृष्णनगर, क्रांतीनगर, पंचतारानगर, शुभश्री सोसायटी
# एस-2 संभाजीनगर टाकी – संभाजीनगर, शाहुनगर (भाग)
# त्रिवेणीनगर टाकी – ऐश्वर्यम सोसायटी परिसर, कोकाटे मंडप, शंकरनगर, विद्यानगर(भाग)
# MIDC वाहिनीवरून पुरवठा – विवेकनगर, तुळजाईवस्ती, शाहुनगर (भाग) के.एस.बी. चौकाजवळील भाग
# फ क्षेत्रीय कार्यालय परिसर – कुदळवाडी ते देहू आळंदी रस्ता उजवी बाजू, रीवर रेसिडन्सी पर्यंत, बालघरे वस्ती, भैरवनाथ मंदिर परिसर, वडाचा मळा परिसर
– मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती, ताम्हाणे वस्ती (s2)
– से.22 टाकी वरील परिसर, यमुनानगर
– रुपीनगर (S2)
– जाधववाडी से.16 व 13, जाधववाडी परिसर, आहेरवाडी मधला पेठा व बोलाईचा मळा, राजे शिवाजीनगर, चिखली मोशी शिव रस्ता
# से.क्र. 6 (WD4 टाकी) – से. क्र. 4,6,9.
# से. क्र. 7 व 10 पाण्याची टाकी – से. क्र. 7 व 10 मधील निवासी क्षेत्र व से.क्र. 7 व 10 एम.आय.डी.सी परिसर.
# भोसरी गावठाण टाकी – गव्हाणे वस्ती, आदिनाथ नगर, रामनगर, जे.पी. नगर., शितल बाग, डोळस वस्ती व नाशिक रोड .
# भोसरी (आश्रम शाळा टाकी) – गुळवे वस्ती, भागत वस्ती, शांतीनगर काही भाग
# भोसरी (इंद्रायणी टाकी) – इंद्रायणी (महाराष्ट्र कॉलनी से. क्र. 12) बालाजी नगर
# सँडविक कॉलनी (संततुकाराम टाकी) – खंडोबामाळ, आपटे कॉलनी, नवग्रह मंदिर परिसर. दिघी रोड गवळीनगर राधानगरी श्रीराम कॉलनी. सँडविक कॉलनी, कुरुकृपा कॉलनी, सत्यनारायण सोसा. नूरमोहल्ला, रामनगरी, विठ्ठलपार्क, संभाजीनगर, श्रीकष्णकॉलनी
# बोपखेल (बोपखेल टाकी) – केसरी नगर, .बोपखेल गावठाण., रामनगर., गणेशनगर
# च-होली टाकी – च-होली गावठाण भोसले वस्ती, वाघेश्वर नगर, बुर्डे वस्ती, माठे वस्ती, खडकवासला, ताजणे वस्ती, रासकर सरपंचमळा, डी.वाय.पाटील. कॉलेज, पुर्व पठारे मळा
# दिघी मँगझीन टाकी – दत्तनगर, गजानन महाराज नगर, श्रीराम कॉलनी 1 व 2 गणेशनगर
# पांजर पोळ टाकी – पांडवनगर 1 ते 4 सहकार कॉलनी, गुरुविहार सोसायटी., लांडगे वस्ती., से.क्र. 1 सद्गुरुनगर, फुलेनगर, रामनगर, राधाकृष्णनगर, हुतात्मा चौक, शास्त्री चौक. महादेवनगर
# स्टेडियम टाकी – एस.आर. ए. प्रकल्प, महात्मा फुलेनगर, ज्योती इंग्लीश मिडीयम स्कूल परिसर
# नेहरुनगर टाकी – खराळवाडी, गांधीनगर., जैन संघटना शाळेच्या समोरील व मागील परिसर, आचार्य अत्रे नाट्यगृहाच्या मागील परिसर, स्वरगंगा, म्हाडा सोसायटी. , नेहरुनगर, मनपा गोडाऊन नेहरुनगर शाळा परिसर, महेशनगर (नेहरुनगर टाकी)
# वल्लभनगर टाकी – फुगेवाडी परिसर, उमेश लांडगे परिसर, मध्य कासारवाडी
# अजमेरा टाकी – अजमेरा, मोरवाडी परिसर, लालटोपी नगर

दुस-या दिवशी पाणीपुरवठा होणार भाग (मंगळवार, दि. 7)

# विकास नगर – एम.बी. कॅम्प, नेटके कॉर्नर, विकास नगर मराठीशाळा परिसर, भारतरत्न सोसायटी, पेंडसे कॉलनी
# मामुर्डी – मामुर्डी गावठआण, साईनगर
# पुनावळे – पुनावळे गावठाण, माळवाडी परिसर, काटेवस्ती, पांढरेवस्ती, भुजबळवस्ती
# गुरूव्दारा, डी.वाय.पाटील कॉलेज, वाल्हेकरवाडी (से.29 वरील) – से.क्र.29 टाकीवरील गुरूद्वारा परिसर, वाल्हेकरवाडी गावठाण
# ताथवडे – ताथवडे गावठाण, जिवमनगर, अशोकनगर झोपडपट्टी, पवारवस्ती, सोनवणेवस्ती
# प्रेमलोक पार्क – दळवीनगर, उद्योगनगर, संतोषनगर, इंदरानगर, भोईर कॉलनी, क्वीन्स टाऊन सोसायटी
# सुखनगरी बायपास – सुखनगरी परिसर
# गिरीराज बायपास – गिरीराज कॉलनी परिसर
# चैतन्य बायपास – पवनीनगर, वेताळनगर, सिव्हर गार्डन, जुना जकातनाका, रस्टन कॉलनी, एस.के.एफ. सोसायटी
# Elpro टाक्या – चिंचवडगाव, केशवनगर, श्रीधरनगर, चंद्रभागा कॉलनी, माणीक कॉलनी, सुदर्शननगर, हिंदुस्थान बेकरी पाठीमागील परिसर, विजयनगर झोपडपट्टी
# तानाजीनगर बायपास – तानाजीनगर परिसर
# भाटनगर बायपास – भाटनगर परिसर
# पिंपळेगुरव टाक्या व बायपास – जयभवानीनगर, लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव गावठाण, भालेकरनगर, सुवर्णा पार्क, मोरया पार्क, प्रभातनगर, काशिदपार्क, गुप्ताचाळ, सह्याद्री कॉलनी, शिवराजनगर, गजाजननगर, सुयोग कॉलनी, काटेपुरम, वृंदावन पार्क, नंदनवन कॉलनी, राजीव गांधीनगर
# कासारवाडी टाकी – हिराबाई लांडगे झोपडपटटी, जवळकर चाळ, शास्त्रीनगर, केशवनगर, गुलिस्ताननगर, ह प्रभाग कार्यालयाचा परिसर
# सांगवी टाक्या – कृष्णानगर, शिवाजी पार्क, समर्थनगर, किर्तीनगर, गणेशनगर, लमतानगर, संततुनगर, सी.एम.ई. सोसायटी, स्वामी विवेकानंदनगर, आदर्शनगर, पी.डब्ल्यु.डी. वसाहत, मधुबन सोसायटी, शितोळेनगर, शिक्षक सोसायटी, सातपूडा सोसायटी, मुळानगर, चंद्रमणीनगर, , लक्ष्मीनगर, संगमनगर, पवनानगर, ममतानगर
# दत्तनगर-थेरगाव – दत्तनगर, पद्मजी पेपरमील, बारणे कॉर्नर, गंगा आशियाना, क्रांतीवीरनगर
# जयमल्हार कॉलनी, ड्रायव्हर कॉलनी, अशोका, गोकुळ बायपास – जयमल्हार कॉलनी, क्र.1 ते 7, शिवतिर्थनगर, सुंदर कॉलनी, गुरू नानकनगर, श्रीकृष्ण कॉलनी, भोरडेनगर, ड्रायव्हर कॉलनी
# लक्ष्मणनगर पाण्याची टाकी, कस्पटेवस्ती बायपास – संतोष मंगल कार्यालय ते रिदम सोसायटी- काळेवाडी फाटा, पोलीस लाईन, मातोश्री हॉसिंग सोसायटी परिसर दामोदर गुजर पथ ते रघुनंदन मंगल कार्यालयापर्यंत, पडवळनगर, पवार नगर, स्वप्नपुर्ती, आदर्श कॉलनी, गणेश कॉलनी
# भगवाननगर टाक्या – भूमकरवस्ती, विनोदेवस्ती, इडन गार्डन टॉवर, पारखेवस्ती, शनीमंदिर, भूजबळवस्ती. सयाजी हॉटेल परिसर’
# काळाखडक टाकी – काळाखडक झोपडपट्टी, स्वामी विवेकानंदनगर
# जगताप डेअरी टाकी, कस्पटेवस्ती टाकी, पार्क स्ट्रीट, पिंपळे निलख टाकी व बायपास – विशाल नगर, जगताप डेअरी परिसर, कस्पटेवस्ती,
पार्क स्ट्रीट, पिंपळे निलख गावठाण, रक्षक सोसायटी, भारत ईलेक्ट्रॉनिक्स
# वाकड बायपास, मयूर इस्टेटचा व्हॉल्व – वाकडरोड, शेखवस्ती, कलाटेनगर, इडन गार्डन परिसर, दत्तमंदिर परिसर, माऊंट वर्ट सेविल, माऊट वर्ट ट्रंक्विल
# बालेवाडी स्टेडीयम – बालेवडी स्टेडीयम
# ESI हॉस्पिटल – ESI हॉस्पिटल
# ई-एक – से.क्र.25, दत्तवाडी, आकुर्डी, से.क्र.24 (भाग)
# खंडोबा माळ ESR -1 – काळभोरनगर, दवाबाझार, चिंचवड रेल्वे स्टेशन, अण्णासाहेब मगर झोपडपट्टी
# खंडोबा माळ ESR -2 – मोहननगर(भाग), गवळीवाडी, इंदिरानगर ऑटो कल्स्टर
# त्रिवेणीनगर टाकी – मोहननगर(भाग),फुलेनगर, रामनगर, विद्यानगर, दत्तनगर, (भाग)
# MIDC वाहिनीवरून पुरवठा – आनंदनगर
# फ क्षेत्रीय कार्यालय परिसर – कुदळवाडी ते देहू आळंदी रस्ता डावी बाजू, हरगुडेवस्ती, महाराष्ट वजन काटा परिसर, गणेश मंदिर परिसर
– त्रिवेणीनगर टाकी वरील पूर्ण परिसर, त्रिवेणीनगर, तळवडे रोड उजवी बाजू
– तळवडे गावठाण, देवी इंद्रायणी सोसायटी, देहू आळंदी रोड,त्रिवेणीनगर ते तळवडे रोड डावी बाजू (S2)
– नागेश्वर शाळा, व्ह‍िस्टेरीया सोसायटी, इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय परिसर, चिखली गावठाण लाईन,रामदासनगर, महादेवनगर, गिताई कॉलनी, लोंढेवस्ती, रोकडेवस्ती, धर्मराजनगर, पाटीलनगर,शेलारवस्ती परिसर
– सोनवणेवस्ती रोड ते गणेश सोसायटी चिखली पर्यंत (S2)
– कृष्णानगर, शिवतेजनगर, पूर्णानगर, अजंठानगर
– सचिन परिसर
– शरदनगर
– घरकुल
# मोशी टाकी व WD4 टाकी – गायकवाड वस्ती, नागेश्वर नगर. इंद्रायणी पार्क, गणेशनगर, नंदनवन, मोशी गावठाण, लक्ष्मीनगर उत्तर । दक्षिण. बनकर वस्ती दोन्ही बाजू
– सस्तेवाडी, अल्हाट वस्ती, मोशी गावठाण परिसर
– शिवाजी वाडी, नागेश्वर विद्यालयामागील परिसर. शिवाजी वाडी, जकात नाका परिसर. देहू रस्ता डावी बाजू. देहू रस्ता उजवी बाजू
– आदर्शनगर कचरा डेपो भाग- 1, आदर्शनगर पेट्रोल पंप मागील भाग-2, आदर्शनगर कचरा डेपो भाग-३., संततुकाराम नगर कचरा डेपो भाग
बो-हाडेवाडी टाकी – वाघेश्वर नगर, बनकर वस्ती खालचा भाग (चिंचेच्या झाडापासून) बनकर वस्ती (अशोक बनकर भाग), विनायक नगर.संजयगांधी नगर व सुवर्ण ढाबा परिसर, बोराटे वस्ती, नाशिक रोड. टेकाळे वस्ती खालचा भाग.टेकाळे वस्ती वरचा भाग.सिल्व्हर हॉटेल, बो-हाडे वाडी, पंचशील हॉटेल, सावतामाळी नगर
WD4 सेक्टर -6 – तापकिर नगर. गंधर्व नगरी. खानदेश नगर. गणेश साम्राज्य सेक्टर -3
# भोसरी गावठाण टाकी – भोसरी गावठाण, लोंढे तालीम
# भोसरी (लांडे वाडी चौक) एम.आय.डी.सी. पाणी पुरवठा – विकास कॉलनी, लांडे वाडी, माळी गल्ली, मदने निवास
# दिघी नवी टाकी – दिघी गावठाण, विजय नगर, चौधरी पार्क, रुण्वाल पार्क, काटे वस्ती. मंजुरीबाई शाळा परिसर भारतामाता नगर, गणेश कॉलनी 1 ते 4, हनुमान कॉलनी नं. 1 व 2, सहकार कॉलनी 1 व 2. कृष्णा नगर, श्रीराम कॉलनी, ज्ञानेश्वर पार्क, शिवनगरी (भाग) सावंत नगर, महादेवनगर
# दिघी जुनी टाकी – साईपार्क. परांडेनगर, दत्तगड नगर, आदर्शनगर, शिवनगरी, सह्याद्री कॉलनी
# च-होली टाकी – कोतवालवाडी, काळजेवाडी, पठारे मळा, साठे नगर, पाटोळे वस्ती, भोसले वस्ती
# वडमुखवाडी टाकी – पद्दमावती नगर, काळीभिंत (दत्तनगर), आझाद नगर, चोवीसावाडी, वडमुखवाडी, तापकिर वस्ती, शिवनगरी, जगताप वस्ती, कानिफनाथ गल्ली
# दिघी मँगझीन टाकी – दिघी मँगझीन, डि.एड.कॉलेज, मौझे शाळा, साईनगरी, साई मंदिर, लक्ष्मीनारायण नगर. ताजणे मळा, पठारे कॉलनी. प्रगती हॉटेल मागे.
# पांजरपोळ टाकी – शिवशंकर 1 ते 4, देवकर वस्ती. गणराज कॉलनी 1 ते 4, मधुबन. अक्षय नगर, आनंद नगर
# स्टेडियम टाकी – गवळीमाथा (गुलाब पुष्प उद्यान समोर) उद्यम नगर
# नेहरुनगर टाकी – वल्लभ नगर, गंगानगर, संततुकाराम नगर. सुखवानी, गंगास्काय सोसायटी
# वल्लभनगर टाकी – कासारवाडी रेल्वेगेटाखालील परिसर, धावडे मास्तर परिसर, शंकरवाडी, गुलीस्थान नगर. कासारवाडी रेल्वेगेटावरील परिसर, शाम लांडे परिसर, कुंदन नगर, मनपा शाळा परिसर
# डुडूळगाव टाकी – डुडूळगाव परिसर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.