Nigdi : दरवाजा वाजवल्याचा जाब विचारल्याने महिलेला चाकूने मारहाण

एमपीसी न्यूज – घराचा दरवाजा वारंवार  (Nigdi) वाजवल्याने जाब विचारला असता महिलेला एकाने चाकूने मारून जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि. 5) सायंकाळी चार वजता ओटास्कीम, निगडी येथे घडली.

याप्रकरणी 35 वर्षीय जखमी महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार करण हरिजन (वय 19, रा. ओटास्कीम, निगडी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

Talegaon : कपड्यांचे शोरूम फोडून रोख रक्कम पळविली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी करण हा फिर्यादी यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर राहतो. त्याने फिर्यादी यांच्या घराचा दरवजा वारंवार वाजवला. त्याचा जाब फिर्यादी यांनी विचारला. त्यावरून आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करून चाकूने त्यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत  (Nigdi) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.