Talegaon : कपड्यांचे शोरूम फोडून रोख रक्कम पळविली

एमपीसी न्यूज – कपड्यांचे शोरूम फोडून चोरट्यांनी साडेपाच (Talegaon ) हजार रुपये आणि एक टी शर्ट चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 5) सकाळी सात वाजता पीटर इंग्लंड शोरूम तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली.

किरण दिलीप निघोजकर (वय 28, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Wakad : न्यायप्रविष्ठ असलेल्या प्रकरणात न्याय मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पीटर इंग्लंड या कंपनीच्या कपड्यांचे शोरूम आहे. त्यांनी त्यांचे दुकान गुरुवारी (दि. 4) रात्री साडेनऊ वाजता कुलूप लाऊन बंद केले. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या शोरूमचे लोखंडी शटर तोडून दुकानातून साडेपाच हजार रुपये रोख रक्कम आणि एक काळ्या रंगाचा टी शर्ट चोरून नेला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत (Talegaon )आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.