Pune : नायजेरियन तरुणाकडून 35 ग्रॅम कोकेनसह पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – नायजेरियन तरुणाकडून 35 ग्रॅम कोकेन जप्त करुन तब्बल पावणेतीन लाखांचा मुद्देमाल परिमंडळ एक व खंडणी विरोधी पथकाने कारवाई करत कोंढवा येथील दोराबजी मॉलसमोरुन हस्तगत करून तरुणाला ताब्यात घेतले आहे.

टोगो पश्चिम दक्षिण आफ्रिकेचा नागरिक अहमद ऊर्फ जॉन ओलोरेडे (वय 43, रा.सध्या. मुंबई), असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील दोराबजी मॉलसमोर पोलीस गस्त घालत असताना त्यांना एक नायजेरियन तरुण संशयितपणे फिरताना दिसला असता त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली व त्याच्याजवळ 35 ग्रॅम कोकेन मिळाला. पोलिसांनी त्याच्याकडून  35 ग्रॅम कोकेन, एक मोपेड व मोबाईल असा तब्बल 2 लाख 71 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ही कामगिरी पोलीस उप आयुक्त सुहाल बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, पोलीस कर्मचारी जगदाळे, इनामदार, साळुंखे, मते, गायकवाड मगर, बागवान, बोले यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.