Pune : बांधकामाच्या ठिकाणी उघड्या ठेवलेल्या विजेच्या तारेचा शॉक लागून 9 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

एमपीसी न्यूज – बांधकामाच्या ठिकाणी उघड्या ठेवलेल्या विजेच्या तारेचा शॉक लागून 9 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.2) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मुंढवा येथील केशवनगरमधील एका बांधकाम साईटवर घडली. 

आकाश भागवत कदम (वय 9) असे यातील मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी भागवत राम कदम(वय33, रा. केशवनगर, मुंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भागवत कदम यांचा मुलगा आकाश हा
बांधकामाच्या ठिकाणी खेळत असताना त्याठिकाणी बांधकाम साईटवर विद्युत
कनेक्शनचे काम करणा-यांनी बांधकाम साईटवरील विद्युत पुरवठ्याच्या जागेवर
असलेल्या विजेची तार निष्काळजीपणे उघड्या ठेवल्याने शॉक लागला
व त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.