Pune – पूना हॉस्पिटलमध्ये डॉक्टरची आत्महत्या

एमपीसी न्यूज- पूना हॉस्पिटलमध्ये डॉक्टरनेच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सोमवारी(दि.8) सकाळी 11च्या सुमारास उघडकीस आली आहे. शशिकांत उत्तमचंद बंब(वय 63 ,रा.प्रेमनगर सोसायटी, मार्केटयार्ड) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूना हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरील रेस्टरुममध्ये एका डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून शवविच्छेदनासाठी मृतदेह ससूूून रुग्णालयामध्ये पाठविण्यात आला आहे.

याप्रकरणी पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.