Pimpri News : पिंपरी-चिंचवड व देहू रोड शहरातील काही भागात उद्या पाणीपुरवठा बंद

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड व देहू रोड शहरातील काही भागात उद्या पाणीपुरवठा बंद असणार आहे. उद्या गुरुवार 19 जानेवारी 2023 रोजी  एमआयडीसीच्या (Pimpri News) रावेत येथील अशुद्ध जल उपसा अशुद्ध जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत व यांत्रिक विभागामार्फत देखभाल व दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे एमआयडीसी कडून होणारा पाणीपुरवठा उद्या दिवसभर बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी पाण्याचा पुरवठा अपुरा वा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.

Pimpri Crime : पिंपरी येथून गांजासह एकाला अटक

त्यामुळे पिंपरी-चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी,  फुगेवाडी, निगडी, सीएमई, आर अँड डी दिघी, व्ही एस एन एल, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड, मॉडेल साठी रोड या भागातील सर्व पाणीपुरवठा एमआयडीसी कडून बंद राहणार आहे. तरी नागरिकांनी आवश्यक तो पाण्याचा साठा करून ठेवावा असे आवाहन एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.