Hinjawadi Crime : व्हिडीओला लाइक करणे पडले 12 लाखांना

एमपीसी न्यूज सहज-सोपे पैसे कमावणे कोणाला नको वाटते, असेच एकाला व्हिडीओला लाईक करणे चक्क 12 लाख रुपयांना पडले आहे. (Hinjawadi Crime) त्यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून हा प्रकार  14 आणि 15 जानेवारी रोजी हिंजवडी येथे घडला.

रवी शंकर सोनकुशरे (वय 43, रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri News : पिंपरी चिंचवड व देहू रोड शहरातील काही भागात उद्या पाणीपुरवठा बंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रवी यांच्या फोनवर एक लिंक आली. त्यावर रवी यांनी क्लिक करून त्यात रजिस्ट्रेशन केले. एक व्हिडीओ लाईक केल्यास 50 रुपये मिळतील असे आमिष त्यात दाखवण्यात आले. त्याला रवी बळी पडले. मात्र पुढे प्रोसेस केली असता त्यात अगोदर पैसे गुंतवावे लागत होते. पैसे गुंतवल्यास अधिक रक्कम मिळेल, असे रवी यांना भरवण्यात आले.

रवी यांना सुरुवातीला 16 वेळा रिफंड मिळाला. त्यामुळे त्यांनी ऑनलाईन माध्यमातून 12 लाख 23 हजार 500 रुपये गुंतवणूक केली. परंतु रिफंड आणि बोनस बाबत विचारणा (Hinjawadi Crime) केली असता आरोपींनी ऑनलाईन माध्यमातून गाशा गुंडाळला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.