Pimpri Crime : पिंपरी येथून गांजासह एकाला अटक

एमपीसी न्यूज –  गांजा सेवन करणाऱ्या एकास पिंपरी (Pimpri Crime) पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि.17) सकाळी सात वाजताच्या सुमारास लिंक रोड, पिंपरी येथे करण्यात आली.

विजय तुकाराम गायकवाड (वय 50, रा. पिंपरी गाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार शांताराम हांडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Nehru Stadium : नेहरू स्टेडियमला कोणी वाली आहे का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय गायकवाड हा लिंक रोड पिंपरी येथे सरकारी दवाखान्याच्या कंपाउंड जवळ मंगळवारी सकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास गांजा सेवन करीत होता. याबाबत माहिती मिळाल्यांनतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करून त्याला अटक केली. (Pimpri Crime) त्याच्याकडून गांजा आणि गांजा सेवन करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.