Not showing last seen on Whats App : अचानकपणे व्हॉटसअ‍ॅपची अनेक फीचर्स गायब

Not showing last seen on Whats App: Suddenly many features of Whats App disappear

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या या काळात ‘अब तेरा ही सहारा’ असं ज्याबद्दल म्हणावं लागतं ते म्हणजे सोशल मिडिया. त्यातही सर्वसामान्यांकडून मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे अ‍ॅप म्हणजे Whats App. आज मात्र  या अ‍ॅपची अनेक फीचर्स गायब झाल्याची तक्रार भारतातले युजर्स करत आहेत. तर जगातल्या इतर काही देशांमध्येही या APP ची फीचर्स गायब झाली आहेत. Last Seen, Online Status ही फीचर्स काम करत नसल्याचं बहुतांश लोकांचं म्हणणं आहे.

डाऊन डिटेक्टरवर आज WA डाऊन झाल्याचे सुमारे ४ हजार रिपोर्टस आले. ७३ टक्के लोकांना WA वापरताना फीचर्सच्या अडचणी येत आहेत. तर २४ टक्के लोकांना लास्ट सीन दिसत नाहीये असं डाऊन डिटेक्टरनं म्हटलं आहे. अनेक युजर्सना प्रायव्हसी सेटिंग्जचाही इश्यू येतो आहे. काही ठिकाणी लास्ट सीन दिसत आहे.

आज युनायटेड किंग्डम, अमेरिका आणि युरोपसह भारतातील  WA युजर्सना काही समस्या जाणवत आहेत. आज सकाळपासून लास्ट सीन हे फीचर आपोआप बंद झाले आहे. तसे मेसेज व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याचा शोध घेतला. तर काही जणांकडे लास्ट सीन दिसत आहे तर काहींकडे ते दिसत नाही.

त्यानंतर ते सुरु न होणं ही समस्या जाणवते आहे. Does anyone know what’s going on with whatsapp ? अशा पोस्टही करणं सुरु झालं आहे. त्याचबरोबर ऑनलाइन आहोत हे दाखवणंही बंद झालं आहे तर मेसेज टायपिंग करतो आहोत हे फीचरही बंद झालं आहे. नेमकं हे होण्यामागचं कारण काय हे समजू शकलेलं नाही. मात्र अनेक युजर्सना ही समस्या भेडसावते आहे.

संगीतकार सलील कुलकर्णी यांनीही त्यांच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट केली आहे. ज्या पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘ WhatsApp update… Last seen, See online, See Typing पैकी काहीही दिसणार नाही. happy/unhappy फरक नाही पडत’.

#Whats App ट्र्रेंडही ट्विटरवर सुरु झाला आहे. हा ट्रेंड पोस्ट करत अनेक युजर्सनी काही फीचर्स काम करत नसल्याचं म्हटलं आहे. तर अनेक युजर्सनी विविध मीम्स तयार करुन ती ट्विट करायलाही सुरुवात केली आहे.

मात्र WA हे नेमकं डाऊन कशामुळे झालं आहे, त्याचे काही फीचर्स का बंद झाले आहेत याचं कोणतंही ठोस उत्तर अद्याप मिळू शकलेलं नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.