Weather Report : कोकण – गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

Konkan - Heavy rains likely in Goa and Vidarbha

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तर, कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. येत्या दोन दिवसात कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता पुणे हवामान विभागाने वर्तवली आहे. आज आणि उद्या कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुण्यात आज (दि.20) कमाल 31.1 अं. से तर मुंबई मध्ये 31 अं. से तापमान नोंदवण्यात आले आहे. हवामान खात्याने पुण्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे तर मुंबईत आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

# गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) (1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा: गुहागर 15, कानकोन, मोखेडा 4 प्रत्येकी, दोडामार्ग, कुडाळ, माथेरान, पेडणे, केपे, रत्नागिरी, सांगे, सावंतवाडी, वैभववाडी, वालपोई, वेंगुली 3 प्रत्येकी, चिपळूण, दाभोलीम(गोवा), म्हापसा, राजापूर, संगमेश्वर देवरूख 2 प्रत्येकी, बेलापूर (ठाणे), दापोली, हर्णे, लांजा, मालवण, मडगाव, पालघर, रामेश्वर कृषी, विक्रमगड, वाडा 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र: गगनबावडा 5, राधानगरी 4, पन्हाळा, शाहूवाडी 3 प्रत्येकी, आजरा, चांदगड, सांगली 2 प्रत्येकी, गारगोटी, गिरना, कागल, मिरज, तासगाव, वेल्हे 1 प्रत्येकी.

मराठवाडा: अंबेजोगाई 6, औरंगाबाद, मंथा 5 प्रत्येकी, हदगाव 4, कळमनुरी, सेलू 3 प्रत्येकी, घनसावंगी, हिमायतनगर, हिंगोली, सेनगाव 2 प्रत्येकी, औंधा नागनाथ, माजल गाव, परतूर 1 प्रत्येकी.

विदर्भ: धारणी 5, खारंघा 3, आष्टी, चिखलदरा, काटोल, नारखेडा, वरुड 2 प्रत्येकी, आर्वी, बाभुळगाव, चांदूर, धामणगाव, मोर्शी 1 प्रत्येकी.

घाटमाथा: वळवण 3, खोपोली, कोयना (पोफळी), शिरगाव, लोणावळा (ऑफिस), लोणावळा (टाटा), शिरोटा, दावडी, खंद, ताम्हिणी 1 प्रत्येकी.

# पुढील हवामानाचा अंदाज व इशारा

येत्या दोन दिवसात कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता पुणे हवामान विभागाने वर्तवली आहे. आज आणि उद्या कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाचा इशारा देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.