Talegaon Dabhade : रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसीचे समाज कार्य उल्लेखनीय

0

एमपीसी न्यूज : रोटरी जिल्हा ग्रामीण विभागात रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसीचे समाज कार्य उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्गार रोटरी जिल्हा -3131 चे प्रांतपाल रश्मी कुलकर्णी यांनी काढेल त्या ‌‌सर्व्हिस एक्सलन्स रोटरी ॲवार्ड प्रदान कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या. 

_MPC_DIR_MPU_II

रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी चे प्रांतपाल भेट नुकतीच पार पडली. रोटरी जिल्हा –3131 च्या प्रांतपाल रश्मी कुलकर्णी यांनी हॉटेल ईशा मध्ये झालेल्या कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली. या कार्यक्रमात लिलाबाई जयराम हगवणे यांना सर्व्हिस एक्सलन्स रोटरी अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या अध्यक्षा रो. रजनीगंधा खांडगे आपल्या प्रास्ताविक मधून रोटरी क्लब तळेगाव एम.आय.डी.सी. तर्फे राबवलेल्या विविध 36 प्रकल्पांची माहिती दिली.

विशेषता बारमाही दुर्गभ्रमंती या प्रकल्पाच्या माध्यमातून दर महिन्याला रोटरी सदस्य -परिवारासह गड सफर करून त्या गडाची संपूर्ण इतिहासाची माहिती रो.प्रा. प्रमोद बोराडे देतात तसेच कोविड–19 काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन घेतलेले उपक्रम तसेच विविध कंपनीच्या कामगारांना मल्टीविटामिन औषधे वाटप करण्यात आले तळेगावातील सर्व हॉस्पिटलांना पी .पी.ई.कीट, मास्क, हॅन्ड ग्लोज, वाटप करण्यात आले covid-19 काळात रुग्णांची दखल घेऊन रक्तदान शिबिर आयोजित केले. याचा प्रामुख्याने उल्लेख करून सर्व रोटरी सदस्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडिसी च्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून 38 वर्षे सेवा करणाऱ्या  लिलाबाई जयराम हगवणे ह्या सेवानिवृत्तीनंतरही गरजवंत महिलांना विनामोबदला सेवा देणाऱ्या व त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना या वर्षीचा सर्व्हिस एक्सलन्स रोटरी ॲवार्ड देण्यात आला. असे रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सीचे संस्थापक रो. संतोष खांडगे यांनी या प्रसंगी सांगितले.

covid-19 काळामध्ये रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी मधील उत्तम कामगिरी केलेले डॉक्टर पत्रकार आणि शिक्षक यांना कोविड- योद्धा पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला यामध्ये डॉक्टर कोविड योद्धा–रूथ सालेर, डॉ. विजय इंगळे ,डॉ. क्रांती इंगळे ,डॉ. नितीन नागरे ,डॉ. माधव पाटील, डॉ.राजश्री पाटील, डॉ. अशोक दाते, डॉ. तेजश्री दाते, पत्रकार योध्दा–रो.विलास भेगडे ,रो. गणेश बोरुडे , रो.अतुल पवार, रो.काकासाहेब काळे, शिक्षक कोरोना योध्दा–रो लक्ष्मण मखर, रो.पांडुरंग पोटे, रो.रवींद्र दंडगव्हाळ, रो सुमती निलवे, रो. राजेश्री  सुरवसे, नीलम मखर, सुनीता पोटे, मनीषा दंडगव्हाळ,रो. मिलिंद शेलार तसेच रोटरी परिवारातील ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेले सदस्य व समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल व नामांकित संस्थेवर उच्च पदावर निवड झालेल्याचा सत्‍कार रोटरी प्रांतपाल रो.रश्मी कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.

रोटरी अध्यक्षा रजनीगंधा खांडगे यांनी रोटरी क्लबचा यावर्षीचा वार्षिक अहवाल प्रांतपाल रो.रश्मी कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्त केला. रोटरी क्लब तर्फे प्रकाशित होणारे रोटल बुलेटीन चे प्रकाशन प्रांतपाल रो. रश्मी कुलकर्णी,रो.गणेश कुदळे, यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच गणेश भेगडे ,सुवर्णा मते, जगन्नाथ काळे, मंगल घोजगे, या नवीन सदस्यांना प्रांतपाल रो. रश्मी कुलकर्णी यांच्या हस्ते पिन अप करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम .आय. डी.सी. तर्फे रोटरी फाउंडेशनला दोन लाख 51 हजारांचा धनादेश प्रांतपाल रो . रश्मी कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. त्यामुळे ग्रामीण भागातील पहिला 100% डोनर क्लबचा बहुमान रोटरी क्लब तळेगाव एम. आय .डी .सी .ला प्राप्त झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रो.अनिल धर्माधिकारी व रो. लक्ष्मण मखर यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन रो. सचिन कोळवणकर, रो.विल्सेंन्ट सालेर ,रो. मिलिंद शेलार,रो.प्रवीण जाधव, यांनी केले तर आभार प्रदर्शन सुमती निलवे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment