Pimpri News : बाल दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी केली मेट्रोची सफर

एमपीसी न्यूज – बाल दिनानिमित्त श्री म्हाळसाकांत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मेट्रोची सफर केली. मेट्रोच्या संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन येथील मेट्रो अधिकारी अमोल मुदळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी विद्यालयातील 30 विद्यार्थ्यांनी मेट्रो सफरीचा आनंद घेतला.

यावेळी विद्यार्थ्यांसोबत सिंधू मोरे, अशोक आवारी, खंडू साठे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना चित्रफितीद्वारे मेट्रो वाहिन्या, त्यांचे मार्ग, दर दोन मिनिटांनी येणारे स्टेशन, दर दोन मिनिटांनी सुटणारी मेट्रो व भुयारी मार्गांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा आढावा घेऊन चांगल्या प्रश्नांना बक्षीस देण्यात आले. बालदिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

कमी खर्चात वातानुकुलित मेट्रो प्रवास कसा सुखकर आहे, याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, शहर स्मार्ट सिटी व्हावे यासाठी पुणे मेट्रो किती उपयोगी आहे याविषयी माहिती देण्यात आली. मेट्रो सुरू झाल्यानंतर लवकरच यातून प्रवास करणार असा विश्वास विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.