Talegaon Dabhade News : जागतिक महिला दिनानिमित्त रोटरीकडून महिलांना माहेरची साडी देऊन गौरव

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अनेक महिलांचा माहेरची साडी देऊन सन्मान करण्यात आला. रोटरीने ‘माहेरची साडी’ व ‘ज्येष्ठ माता भगिनींचा सन्मान सोहळा’ इशा हाॅटेल येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रोहित शिंदे यांनी महिलांना आरोग्यविषयक अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केले मान्यवरांच्या हस्ते माता भगिनींचा सन्मान करण्यात आला

श्रीमती फुलाबाई काळोखे, श्रीमती पुष्पा वसंतलाल मेहता, कमल कृष्णाजी देशमाने, श्रीमती केशरबाई शिवाजी कडलक, सौ शारदा यशवंतराव दाभाडे, सौ लक्ष्मीबाई रघुनाथ शेंडे, सौ सुषमा जीवन नांदगावकर, व श्रीमती मीराताई दशरथ फल्ले यांचा यावेळी माहेरची साडी, सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

संस्थापक अध्यक्ष रो विलास काळोखे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या तर रो गडसिंग साहेब, रो दीपक फल्ले, रो सुरेश दाभाडे व रो किरण ओसवाल यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प प्रमुख रो शरयू देवळे, प्रास्ताविक रो शाईन शेख, स्वागत रो रेश्मा फडतरे तर आभार रो वैशाली खळदे यांनी मानले.

कार्यक्रमाचे नियोजन रो रिजवाना शेख, रो सुरेश शेंडे,रो संजय मेहता, रो बाळासाहेब रिकामे ,रो संतोष शेळके, रो प्रशांत ताय, रो डॉ मिलिंद निकम, रो अविनाश नांगरे, रो संतोष परदेशी, रो डॉ सौरभ मेहता,रो रोहित मणियार,रो राजेंद्र कडलक, रो सुनील महाजन व रो सुमंत जगताप यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.