Maval : वडगाव मावळ येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

एमपीसी न्यूज – स्थानिकांना रोजगार मिळण्याबाबत वडगावमावळ तहसिल कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. अशी माहिती, माहिती अधिकार कार्यकर्ते जागतिक मानव अधिकार जनजागर समिती व महाऱाष्ट्र राज्य भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप नाईक यांनी दिली.

हे उपोषण वडगाव मावळ तहसिलदार कार्यालयासमोर दि. ३० ऑक्टोबरला होणार असून यावेळी स्थानिकांना रोजगार मिळालाच पाहिजे, स्थानिकांना कॉन्ट्रक्ट मिळालेच पाहिजे या मागण्या मांडण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.