Vadgaon : काळजीने देखभाल करणारं कुणीच नसल्याने तीन भावंडे भरकटली

एमपीसी न्यूज – काळजीने देखभाल करणारं कुणीच नसल्याने राहत्या घरातून ( Vadgaon) तीन लहान भावंडे भरकटली. वडगाव मावळ येथील घरातून 31 ऑक्टोबर रोजी निघालेली तीनही भावंडे 3 नोव्हेंबर रोजी एकविरा गडाच्या पायथ्याला आढळून आली.

प्रेम शरद हिवराळे (वय 13), भाग्यश्री शरद हिवराळे (वय 11), प्रेरणा शरद हिवराळे (वय 9) अशी भरकटलेल्या मुलांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रेम, भाग्यश्री आणि प्रेरणा ही तीनही भावंडे सावत्र वडिलांसोबत वडगाव मावळ येथे राहतात. वडील पुण्यामध्ये ट्रक चालक म्हणून काम करतात. तर आई नारायणगाव येथे कला केंद्रात काम करते.

माळीनगर येथील झोपडपट्टीमध्ये पालामध्ये ही भावंडे राहतात. खायची भ्रांत अन शिक्षणाचा थांगही नसल्याने ही मुले दिवसभर भटकत असतात. 31 ऑक्टोबर रोजी वडील कामावर गेल्यानंतर तिघेही घराबाहेर पडले.

ही मुले जुना पुणे मुंबई महामार्गाने थेट कार्ला फाटा आणि तिथून कार्ला गडाकडे गेली. कार्ला गडावर गेल्यानंतर तिथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ‘आम्हाला कोणीही नाही. आम्हाला काम द्या, आमचा सांभाळ करा’ अशी विनवणी करू लागली.

दरम्यान, मुलांच्या 30 वर्षीय आईने वडगाव मावळ पोलीस ठाण्यात मुळे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी मुलांचे फोटो आणि वर्णन परिसरातील पोलीस पाटील यांना पाठवले होते.

Pimpri : पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोशिएशनच्या नव्या कार्यकारणीला प्रमाणपत्र वाटप

वेहेरगावचे पोलीस पाटील अनिल पडवळ यांना या मुलांबाबत माहिती ( Vadgaon) ) मिळाली. त्यांनी तत्काळ लोणावळा ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी वडगाव मावळ पोलिसांना माहिती देत मुलांना वडगाव मावळ पोलिसांच्या ताब्यात दिले.

अनिल पडवळ म्हणाले, “पोलिसांनी दिलेल्या वर्णनाची तीन मुले कार्ला गडाच्या व्हीआयपी पार्किंग जवळ असल्याची माहिती वन विभागाच्या एका कर्मचाऱ्याने दिली. त्यानुसार तिथे जाऊन खात्री करून पोलिसांना त्याबाबत माहिती दिली. पोलीस येईपर्यंत मुलांना थांबवून ठेवले. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

वडगावचे पोलीस निरीक्षक कुमार कदम म्हणाले, “काळजीपूर्वक देखभाल करणारे कोणी नसल्याने मुले भरकटली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर याबाबत आम्ही तातडीने सर्वत्र शोध सुरु केला.

एका दिवसात मुलांना शोधण्यात यश आले आहे. तीनही मुले सुखरूप आहे. वडगाव मावळ पोलिसांकडून अशा काही मुलांच्या शाळेची जबाबदारी घेण्यात आली आहे. योग्य वयात मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणणे फार महत्वाचे ( Vadgaon) )आहे.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.