Pimpri: आणखी एक महिला कोरोना पॉझिटीव्ह; सक्रिय रुग्णांची संख्या दहावर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (गुरुवारी) आणखी एक महिला कोरोना पॉझिटीव्ह आली आहे. त्या महिला कोणाच्या संपर्कात आली होती, ‘ट्रॅव्हल हिस्ट्री’ काय होती हे  समजू शकले नाही.  प्रशासनाकडून माहिती काढण्याचे काम सुरू आहे.  या महिलेच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आलेल्यांना महापालिका रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे शहरातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या दहावर पोहचली आहे.

या महिलेचा रात्री उशिरा रिपोर्ट आला. त्यामध्ये महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वायसीएम रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात महिलेवर उपचार सुरु आहेत.  महिला कोणाच्या संपर्कात आली होती, ट्रॅव्हल हिस्ट्री आहे का हे मात्र समजू शकले नाही. प्रशासन त्याची माहिती घेत आहे. या महिलेच्या रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आलेल्यांना तातडीने महापालिका रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात येणार आहेत.

याशिवाय दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेल्यांच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील बुधवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आलेल्यांना देखील महापालिका रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांचेही नमुने आज तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

दरम्यान, शहरात 10 मार्चपासून आजपर्यंत 22 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी बारा बरे झाले आहेत. नऊ बाधित रुग्णांवर वायसीएम रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु होते. त्यामध्ये आज आणखी एकाची भर पडली आहे. त्यामुळे पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या दहावर पोहचली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.