PCMC : महापालिकेच्या 14 कर्मचाऱ्यांना ओळखपत्राची ‘अलर्जी’!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या (PCMC)तपासणी पथकाकडून आज (मंगळवारी) मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये प्रवेशद्वारावर पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या गणवेश व ओळखपत्रांची तपासणी करण्यात आली. उप आयुक्त विठ्ठल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या तपासणीत 14 जणांनी ओळखपत्र लावलेले नसल्याचे आढळून आले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत आठ हजाराहून अधिक (PCMC)कर्मचारी आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना गणवेश निश्चित केला आहे. कर्मचाऱ्यांना दररोज गणवेश परिधान करणे बंधनकारक आहे. तसेच ओळखपत्र लावणे आवश्यक आहे. मात्र, अनेक कर्मचारी गणवेश परिधान करताना दिसत नाहीत. ओळखपत्र लावत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने आज अचानक तपासणी केली.

Dighi : सराईत वाहन चोरट्यांना अटक; सात दुचाकी जप्त
तपासणी पथकाने मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये प्रवेशद्वारावर पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या गणवेश व ओळखपत्रांची तपासणी केली. या तपासणीत 14 जणांनी ओळखपत्र लावलेले नसल्याचे आढळून आले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.