PCMC : महापालिका सेवकांच्या पतसंस्थेच्या सभासदांना 14 टक्के लाभांश जाहीर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या (PCMC) सभासदांना 14 टक्के दराप्रमाणे लाभांश, सेवानिवृत्त व सलग 25 वर्ष पतसंस्थेचे सभासद असणाऱ्या सभासदांना रक्कम रुपये पाच हजार रुपये बक्षीस म्हणून अदा करण्यात आले. तसेच या सभासदांना शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले व सभासदांच्या गुणवंत पाल्यांना व राज्यस्तरीय खेळाडूंना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेची 52 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच  चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात अध्यक्ष शशिकांत उर्फ बबनराव झिंजूर्डे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या वार्षिक सर्वसाधारण सभेस प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार गौतम चाबुकस्वार, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप व कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, महापालिका सेवक पतसंस्थेचे अध्यक्ष सनी कदम,

PCMC : महापालिकेत यशवंत डांगे, किरणकुमार मोरे यांची प्रतिनियुक्ती

उपाध्यक्ष अनिल लखन, सचिव वैभव देवकर, खजिनदार विजया कांबळे, संचालक चारुशीला जोशी, नथा मातेरे, विशाल भुजबळ, शिवाजी येळवंडे, विश्वनाथ लांडगे, कृष्णा पारगे, संदीप कापसे, विजय नलावडे, धर्मेंद्र शिंदे, संजय कापसे, नंदकुमार इंदलकर, लाला गाडे, उमेश बांदल, मंगेश कलापुरे, विशाल बाणेकर, चंद्रशेखर गावडे, तुषार कस्पटे, सुरज टिंगरे, दत्तात्रय ढगे, प्रमोद अंबपकर, मदन चिंचवडे किसन आरजे, देवराम जगदाळे, सुहास ताकवले आदी उपस्थित होते.

पतसंस्थेचे सचिव वैभव देवकर यांनी सभासदांसमोर (PCMC) विषयांचे वाचन केले. विषयांना सभासदांनी बहुमताने मंजुरी दिली. पतसंस्थेचे अध्यक्ष सनी कदम यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.